Bjp Congress Alliance : सध्याच्या राजकारणात कधी काय होईल? कोण कोणाशी युती करेल , कोण कोणाशी आघाडी करेल? हे सांगणं ज्योतिषांनाही जमणार नाही.. त्यातच सध्याच्या नगरपालिका महापालिका, नगरपरिषद या निवडणुकीत कधी भाजप शिंदे यांची युती होते. कधी भाजप राष्ट्रवादीची युती होते. तर काही ठिकाणी शिंदे गट आणि राष्ट्रवादी मध्ये युती बघायला मिळाली. मात्र आता चक्क देशातील कट्टर विरोधक असलेल्या भाजप आणि काँग्रेसमध्ये युती झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजप व काँग्रेस युतीमुळे सध्याच्या राजकारणात नेमकं चाललय तरी काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्याशिवाय राहणार नाही.
कुठे झाली भाजप काँग्रेस युती (Bjp Congress Alliance)
भाजप आणि काँग्रेसची युती अंबरनाथ मध्ये झाली आहे. अंबरनाथ नगरपरिषदेत भाजपने शिंदे गटाला बाजूला सारून काँग्रेस सोबत युती केली आहे. काँग्रेसच्या पाठिंब्याच्या जोरावरच अंबरनाथ नगर परिषदेत भाजप सत्ते देणार आहे. भाजपचे 16, काँग्रेसचे 12 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 4 अशा एकूण 32 नगरसेवकांची मोट भाजपने बांधली आहे. भाजपच्या तेजश्री करंजुले या नगराध्यक्ष म्हणून विजयी झाल्या आहेत. Bjp Congress Alliance
शिंदे गटाच्या जिव्हारी
दरम्यान शिंदे गटाला भाजप काँग्रेसची युती चांगली ची वारी लागली आहे. एकीकडे काँग्रेसमुक्त भारत करणाऱ्या भाजपाने काँग्रेसची हात मिळवणी करत शिवसेनेचा घात केल्याचं शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांनी म्हटलं आहे. तर गेल्या पंचवीस वर्षापासून भ्रष्टाचार केलेल्या शिंदे गटाला सोबत घेऊन जर सत्तेत बसलो असतो तर ती अभद्र युती झाली असती असं म्हणत भाजपा उपाध्यक्ष गुलाबराव करंजुले पाटील यांनी शिंदे गटाला जोरदार प्रत्युत्तर दिले.
अंबरनाथ नगरपरिषदेवर भाजपने झेंडा फडकला होता. या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष भाजपाचा झाला असला तरी देखील याठिकाणी सर्वाधिक नगरसेवकपदाचे उमेदवार शिवसेनेचे विजयी झाले आहेत. नगराध्यक्षपद आणि नगरसेवकांच्या 59 जागांसाठी याठिकाणी निवडणूक पार पडली होती. शिवसेना शिंदे गटाने 23 जागांवर विजय मिळवला. तर भाजपने 16 जागा, काँग्रेस 12 जागा आणि अजित पवाराच्या राष्ट्रवादीने 4 जागांवर विजय मिळाला होता.






