मुंबईतील शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर आज पहाटे रंग फेकण्याची घटना (Meenatai Thackeray Statue News) समोर आली आणि मुंबईसह महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली…ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना या दोन्ही शिवसेनेकडून या घटनेचा निषेध करण्यात आला. एवढेच नव्हे तर स्वतः उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळी जाऊन पुतळ्याची पाहणी केली. अखेर या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. उपेंद्र गुणाजी पावसकर असे आरोपीचे नाव असून गुन्हा केल्याचे त्याने कबूल केल्याची सूत्रांची माहिती आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आपण मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग का फेकला याचे कारण सांगताना आरोपीने धक्कादायक कबुली दिली आहे.
काय म्हणाला आरोपी?? Meenatai Thackeray Statue News
सूत्रांच्या माहितीनुसार मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकणारा आरोपी हा ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ आहे. आपण हे कृत्य का केले (Meenatai Thackeray Statue News) याचे कारण सांगताना आरोपी म्हणाला की, संपत्तीच्या वादात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करत करत होते…. दादर पोलीस ठाण्यात श्रीधर पावसकर आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी सातत्याने यायचा, अशी सूत्रांची माहिती आहे. आता, आरोपीचा जबाब नोंदवल्यानंतर पोलिस अधिक तपास करीत आहेत.
मुंबईतील वातावरण तापलं
मीनाताई ठाकरे या बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी आणि उद्धव ठाकरे यांच्या मातोत्री आहेत. त्यामुळे शिवसैनिक त्यांना आदराने माँ साहेब म्हणतात. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकलेच्या घटनेनंतर मुंबईतील वातावरण चांगलेच तापल्याचं बघायला मिळालं. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंनी स्वतः शिवाजी पार्कवर जाऊन मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची पाहणी केली. स्वत:च्या आई-वडिलांचं नाव घ्यायला शरम-लाज वाटणाऱ्या लावारिस लोकांनी हे कृत्य केलं असेल असं म्हणत उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त केला तर दुसरीकडे आरोपीला 24 तासात अटक करा अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली एवढेच नव्हे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या गोष्टीचा तीव्र निषेध केला. ही घटना अतिशय निंदनीय आहे, याप्रकरणात कोणत्याही समजकंठकाला सोडणार नाही. यासंदर्भात मी स्वतः पोलीस आयुक्तांशी बोललो आहे, मुख्यमंत्र्यांनी देखील लक्ष घातले आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले.






