प्रांजल खेवलकरांच्या फोनमध्ये ‘ते’ आक्षेपार्ह व्हिडिओ; आगामी काळात अडचणी वाढणार?

Written by:Rohit Shinde
Published:
प्रांजल खेवलकर यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. पोलिसांनी न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार, प्रांजल खेमलकर यांच्या फोनमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ आढळले आहेत.
प्रांजल खेवलकरांच्या फोनमध्ये ‘ते’ आक्षेपार्ह व्हिडिओ; आगामी काळात अडचणी वाढणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरणाता सातत्याने नव्या अपडेट्स समोर येत आहे. एकीकडे त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्याने काहीसा दिलासा मिळाला असला तरी त्यांची सुटका होण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्याचे कारण असे की प्रांजल खेवलकर यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. पोलिसांनी न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार, प्रांजल खेमलकर यांच्या फोनमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ आढळले आहेत. सुनावणीदरम्यान पोलिसांनी ही माहिती न्यायालयासमोर ठेवली.

खेवलकरांच्या मोबाईलमध्ये नेमके काय गुपित?

प्रांजल खेमलकर यांनी एका मुलीचे व्हिडिओ दुसऱ्या आरोपीला पाठवताना “ऐसा मार चाहिए” असा मेसेज केल्याचेही पोलिसांनी सांगितले. या माहितीमुळे प्रांजल खेमलकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात प्रांजल खेमलकर यांच्यासह एकूण पाच आरोपींना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ही न्यायालयीन कोठडीची कारवाई त्यांच्यासाठी पुढील आव्हाने निर्माण करू शकते. या घटनेमुळे या प्रकरणातील गांभीर्य अधिक स्पष्ट झाले आहे.

पुणे रेव्ह पार्टीचे प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहे. एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना ड्रग्ज पार्टी प्रकरणी 14 दिवसांची न्यायालीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. पण न्यायालयाने पोलिसांची मागणी फेटाळली आणि आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे आता यानिमित्ताने प्रांजल खेवलकरांना जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

प्रांजल खेवलकरांना जामीन मिळण्याची शक्यता

आधी दोन महिलांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आता उर्वरित पाच आरोपींनाही न्यायालीयन कोठडी सुनावण्यात आल्याने या सर्वांना जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रांजल खेवलकर यांच्या फोनमध्ये काही आक्षेपार्ह व्हिडीओ आणि चॅट सापडल्याची माहिती पुणे पोलिसांनी न्यायालयात दिली. प्रांजल खेवलकर याने एका मुलीचे व्हिडीओ दुसऱ्या आरोपीला पाठवत ‘ऐसा माल चाहिए’ असा मेसेज केला आहे. या सर्व प्रकरणाचा तपास करायचा आहे. त्यामुळे आरोपींची पोलीस कोठडी वाढवून द्यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती. पण न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली.

खेवलकरांना अडकवण्याचा प्रयत्न?

दरम्यान सातही आरोपींना काल न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी विजयसिंह ठोंबरे यांनी प्रांजल खेवलकरांची बाजू मांडली. प्रांजल खेवलकर यांनी कोणत्याही अंमली पदार्थाचे सेवन केलेलं नाही. मेडीकल रिपोर्ट येतील तेव्हा लक्षात येईल कोणत्याही अंमली पदार्थाचे सेवन केलंलं नव्हतं. प्रांजल खेवलकर राहत असलेल्या हॉटेलची रेकी करण्यात आली होती. त्यामुळे हा प्रांजल खेवलकरांना अडकविण्यासाठी षडयंत्र रचण्यात आल्याचा दावा वकीलांकडून केला जात आहे. आता यामध्ये नेमके काय सत्य समोर येते ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे आगामी काळात या प्रकरणात आणखी ट्वीस्ट येण्याची शक्यचा निर्माण झालेली आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews