Marathi News

Politics News : फडणवीसांचे ठाकरेंना 50 फोन, परंतु..; नव्या गौप्यस्फोटाने खळबळ

Published:
मागचा महापौर कसा झाला तो माहिती आहे. आतल्या गोष्टी आम्हाला माहिती आहेत. तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती नसतील. पण त्या माणसाचा तुम्ही फोन घेऊ शकत नाहीत
Politics News : फडणवीसांचे ठाकरेंना 50 फोन, परंतु..; नव्या गौप्यस्फोटाने खळबळ

Politics News : मुंबई महापालिकेची निवडणूक जशी जशी जवळ येते, तसे तसे राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैली वाढताना दिसतात . एकीकडे ठाकरे बंधूंची युती तर त्यांच्या विरोधात शिंदे फडणवीस यांची महायुती असा थेट सामना मुंबईत पाहायला मिळते. मुंबईत सभांचा धडाका सुद्धा दोन्ही बाजूने सुरू आहे. त्यातच आता एका जाहीर सभेत एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे राजकीय खळबळ उडाली आहे.

फडणवीस यांचे ठाकरेंना ५० फोन

शिंदेंनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली. काही जण निवडणुका आल्या की इतिहासात जातात. सातवीचं पुस्तक उघडतात. सूर्याची पिसाळ, अफलज खान, त्यांना आठवतो. बाळासाहेबांचे विचार जपणारा सूर्याजी पिसाळ आहे की त्यांच्या विचारांचा मारेकरी सूर्याजी पिसाळ? लोकांना माहिती आहे. म्हणून ज्यांनी विचार सोडले, भाजपच्या पाठीत ज्यांनी खंजीर खुपसला, 50 फोन देवेंद्र फडणवीस यांनी केले याचा मी साक्षीदार आहे”, असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केला. Politics News

2017 चा महापौर कसा झाला (Politics News)

यावेळी आपल्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी 2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीनंतर शिवसेनेचा महापौर कसा बसला यामागचे गुपित सुद्धा फोडून टाकले. मागचा महापौर कसा झाला तो माहिती आहे. आतल्या गोष्टी आम्हाला माहिती आहेत. तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती नसतील. पण त्या माणसाचा तुम्ही फोन घेऊ शकत नाहीत. तुम्ही ठरवलं होतं की, काय करायचं. सत्तेसाठी लाचार झाले म्हणून बाळासाहेबांच्या विचारांची माळ तोडली असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकेची झोड उठवली.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews