Marathi News

Politics News : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील; भाजप प्रदेशाध्यक्षांच्या विधानाने नवा वाद

Published:
भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता लातूरमधून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही असं रवींद्र चव्हाण म्हणाले. रवींद्र चव्हाण यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसकडून निषेध व्यक्त केला जात आहे.
Politics News : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील; भाजप प्रदेशाध्यक्षांच्या विधानाने नवा वाद

Politics News : संपूर्ण महाराष्ट्रात महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे ठिकठिकाणी सभा आणि रॅली निघत आहेत. यातच लातूर महापालिकेच्या प्रचारादरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या बद्दल केलेल्या एका विधानामुळे नवा वाद पेटला आहे. भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता लातूरमधून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही असं रवींद्र चव्हाण म्हणाले. रवींद्र चव्हाण यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसकडून निषेध व्यक्त केला जात आहे.

रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले? Politics News

लातूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांच्या मेळावा पार पडला. या मेळाव्यास भाजप नेते आ. संभाजी पाटील निलंगेकर, आ. अभिमन्यू पवार, आ. रमेश कराड, माजी मंत्री बसवराज पाटील मुरूमकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना रवींद्र चव्हाण म्हणाले की, भाजप कार्यकर्त्यांचा उत्सव पाहून लक्षात येते की लातूर शहरातून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील, यात काही शंका नाही. रवींद्र चव्हाण यांच्या या विधानानंतर विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. Politics News

विलासराव देशमुख हे लोकनेते

विलासराव देशमुख हे फक्त लातूर पुरते मर्यादित नव्हते. तर त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रात प्रभाव होता. महाराष्ट्राचे नेतृत्व त्यांनी 3 वेळा केले होते. याशिवाय केंद्रातही त्यांना गांधी परिवाराकडून मोठी जबाबदारी देण्यात आली होती.  विलासराव देशमुख यांची नाळ थेट जनतेशी जोडलेली असल्याने त्यांना लोकनेता बोलले जायचं. मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रासाठी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले होते.  नाही का गंभीर आजाराने त्यांचं काही वर्षांपूर्वी निधन झाले.  त्यांच्या निधनानंतर रवींद्र चव्हाण यांनी थेट लातूरमध्ये जाऊन विलासराव देशमुख यांच्या बद्दल अशा प्रकारचे विधान केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews