देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला 75 वा वाढदिवस साजरा केल्यानंतर मोदी आता निवृत्त होणार आणि त्यांच्या जागी दुसऱ्या कोणाची तरी पंतप्रधानपदी वर्णी लागणार या चर्चांना जोर आला. खास करून विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरून मोदींवर टीका करण्यास सुरुवात केली. मात्र आता केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांनी ( Rajnath Singh On Narendra Modi) मात्र मोदींच्या निवृत्तीबाबतच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. एवढेच नव्हे तर 2039 पर्यंत नरेंद्र मोदीच भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील हे सुद्धा ठणकावून सांगितलं. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राजनाथसिंग बोलत होते.
काय म्हणाले राजनाथ सिंह? Rajnath Singh On Narendra Modi
राजनाथसिंह यांनी स्पष्ट केले की २०२९ आणि २०३४ च्या निवडणुका नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील. पुढील १५-२० वर्षांसाठी भारतीय जनता पक्षात पंतप्रधानपदासाठी कोणतीही जागा रिक्त नाही. कारण नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान राहतील. यावेळी राजनाथ सिंह यांनी मोदींसोबत त्यांच्या नात्याबद्दल सुद्धा सांगितल (Rajnath Singh On Narendra Modi) पंतप्रधान मोदींशी माझे नाते जवळजवळ ३५ वर्षांचे आहे. आम्ही पहिल्यांदा झाशीमध्ये भेटलो होतो. तेव्हापासून आणि आताच्या काळात आम्ही त्यांच्यात अनेक बदल पाहिले आहेत. विशेषतः पंतप्रधान झाल्यापासून, त्यांनी असे अनेक आव्हानात्मक निर्णय घेतले आहेत जे घेण्यास फार कमी लोक कचरतील. सर्वात कठीण आव्हानांनाही मोदी घाबरत नाहीत. ही त्यांची ताकद आहे. मागील 35 वर्षात मी त्यांचे व्यक्तिमत्व खूप जवळून बघितल आहे.
मोदींचे कौतुक –
राजनाथ सिंह यांनी नोटाबदी, कलम ३७० रद्द करणे आणि उरी आणि बालाकोट सर्जिकल स्ट्राईक यासारख्या प्रमुख निर्णयांचा उल्लेख करत नरेंद्र मोदी यांचे कौतुकही केलं. मोदींनी या निर्णयांना कशी मोकळीक दिली हे त्यांनी स्पष्ट केले. नरेंद्र मोदींची कल्पनाशक्ती, संयम आणि कोणत्याही आव्हानाला तोंड देण्याची एक विलक्षण क्षमता आहे. मी त्यांना कधीही घाबरलेले किंवा गोंधळलेले पाहिले नाही.
दरम्यान, ऑपरेशन सिंदूर दरम्यान तुमचा अनुभव कसा होता? असा प्रश्न विचारला असता राजनाथ सिंह म्हणाले, पंतप्रधानांनी आम्हाला आमच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले. ते सर्व सैन्य प्रमुखांशी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी बोलले आणि स्पष्ट सूचना दिल्या. त्यांचे निर्णय नेहमीच विचारपूर्वक आणि अचूक असतात असे राजनाथ सिंह म्हणाले..






