राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांचं आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. निवडणूक आयोगाने या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. अद्याप निवडणुकीची घोषणा झालेली नाही. दिवाळीनंतर घोषणा होण्याची शक्यता आहे. याआधी प्रशासकीय पातळीवरील कामकाज पूर्ण केले जात आहे. अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करत आता या प्रक्रियेला खऱ्या अर्थाने गती देण्यात आली आहे.
अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर
जिल्हा परिषदांच्या गट गणांची फेररचना पूर्ण झाली आहे. यानंतर पुढील टप्प्यात जिल्हा परिषदांच्या अध्यक्षांचं आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे. अहिल्यानगर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद यंदा अनुसूचित जमाती-महिला प्रवर्गासाठी आरक्षित झालं आहे. राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. यात राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष पदांसाठीचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. आता नव्याने राजकीय समीकरणे जुळवावी लागणार आहेत. निवडणुका कधी होणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. दिवाळीनंतर निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. याआधी प्रशासकीय कामकाज केले जात आहे. राज्यात अनेक जिल्हा परिषद अध्यक्षांचे आरक्षण बदलले आहे. त्यामुळे कही खुशी कही गम अशी स्थिती आता निर्माण झाली आहे.
34 झेडपींचे अध्यक्षपदाचे आरक्षण
- ठाणे -सर्वसाधारण (महिला)
- पालघर – अनुसुसूचित जमाती
- रायगड- सर्वसाधारण
- रत्नागिरी- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
- सिंधुदुर्ग – सर्वसाधारण
- नाशिक -सर्वसाधारण
- धुळे -नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
- नंदूरबार-अनुसूचित जमाती
- जळगांव – सर्वसाधारण
- अहिल्यानगर अनुसूचित जमाती (महिला)
- पुणे -सर्वसाधारण
- सातारा- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
- सांगली – सर्वसाधारण (महिला)
- सोलापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
- कोल्हापूर- सर्वसाधारण (महिला)
- छत्रपती संभाजीनगर -सर्वसाधारण
- जालना – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
- बीड – अनुसूचित जाती (महिला)
- हिंगोली -अनुसूचित जाती
- नांदेड – नागरिकांचा मागास प्रवर्ग
- धाराशिव – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
- लातूर – सर्वसाधारण (महिला)
- अमरावती – सर्वसाधारण (महिला)
- अकोला – अनुसूचित जमाती (महिला)
- परभणी – अनुसूचित जाती
- वाशिम अनुसूचित जमाती (महिला)
- बुलढाणा -सर्वसाधारण
- यवतमाळ सर्वसाधारण
- नागपूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
- वर्धा- अनुसूचित जाती
- भंडारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग
- गोंदिया – सर्वसाधारण (महिला)
- चंद्रपूर – अनुसूचित जाती (महिला)
- गडचिरोली -सर्वसाधारण (महिला)
गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून जिल्हा परिषद निवडणुका रखडल्या आहेत. त्यामुळे या निवडणुका कधी होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. आता जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठीचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता लवकरच निवडणुका पार पडतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.






