‘रूपाली चाकणकरांवर कारवाई करा…’; आमदार रोहित पवारांनी अशी मागणी का केली?

Written by:Rohit Shinde
Published:
खेवलकरांबाबत गोपनीय माहिती देण्याचा अधिकार चाकणकर यांना नाही, हे राईट टू प्रायव्हसी अधिकाराचं उल्लंघन असल्याचं सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
‘रूपाली चाकणकरांवर कारवाई करा…’; आमदार रोहित पवारांनी अशी मागणी का केली?

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे. राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रांजल खेवलकर प्रकरणात पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले होते. त्यामध्ये, आयोगाकडे प्राप्त अहवालानुसार प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ आणि फोटो असल्याचे सांगत मानवी तस्करीची माहितीयांन दिली. मात्र, चाकणकर यांना ही माहिती दिल्याने त्यांच्यावरच डाव उलटण्याची शक्यता आहे.

‘राईट टू प्रायव्हसीचे उल्लंघन…’

“गोपनीय माहिती देण्याचा अधिकार चाकणकर यांना नाही, हे राईट टू प्रायव्हसी अधिकाराचं उल्लंघन असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. तर, आमदार रोहित पवार यांनीही ट्विट करत रुपाली चाकणकर यांच्याकडून गंभीर गुन्हा घडल्याचं म्हटलं आहे. पुण्यातील कोथरुडमध्ये दलित मुलींवर पोलिसांकडून झालेल्या शेरेबाजीप्रकरणाची गंभरतीने दखल घेतली नाही. मात्र, या मुलीची ओळख सार्वजनिक करत बीएनएस एस 72 नुसार गंभीर गुन्हा केल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता खुद्द रूपाली चाकणकर अडचणीत येतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

रोहित पवार नेमके काय म्हटले?

“महिलांचे मूळ मुद्दे बाजूला ठेवून नेहमी राजकीय भूमिका घेण्याची ख्याती मिळवलेल्या राज्य महिला आयोगाने अजून एक नवीन प्रताप केला आहे. कोथरूडमधील ज्या मुलींवर पोलिसांनी अश्लील व जातीवाचक शेरेबाजी केली त्यांच्या घरात चुकीच्या पद्धतीने घुसून बेकायदेशीर झाडाझडती घेतली. त्या मुलींची ओळख व नाव हे आजवर सर्वांनीच गोपनीय ठेवलं होतं मात्र झोपेतून जागे झालेल्या महिला आयोगाने केलेल्या ट्विटमध्ये सदर मुलीचे नाव टाकले आहे. BNS S72 नुसार हा गंभीर गुन्हा आहे.” असे मत आमदार रोहित पवारांनी मांडले आहे.

चाकणकरांचे खेवलकरांवर गंभीर आरोप 

रूपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटले की, काही गोष्टी मी बोलू शकत नाही, मला संकोच वाटतो बोलताना तपास देखील सुरू आहे. प्रांजल खेवलकर याच्या मोबाईलमध्ये मुलींच्या चॅटचे काही स्क्रीनशॉर्ट आहेत जे धक्कादायक आहेत. मुलींचे नग्न फोटो व्हिडीओ यासोबतच काही व्हिडीओंमध्ये खेवलकर हा स्वत: दिसतोय. मुलींना नशा करायला लावून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आली. त्यामुळे चाकणकरांनी केलेल्या या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली होती.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews