Sharad Pawar On Maratha OBC Dispute : वाटेल ती किंमत मोजू पण….; मराठा – ओबीसी संघर्षावर शरद पवारांचं मोठं विधान

Published:
वाटेल ती किंमत देऊ पण महाराष्ट्र एकसंघ ठेऊ, महाराष्ट्रातील सर्व जाती-धर्मातील लोकांना एकत्र कसे राहतील याचा विचार करू
Sharad Pawar On Maratha OBC Dispute : वाटेल ती किंमत मोजू पण….; मराठा – ओबीसी संघर्षावर शरद पवारांचं मोठं विधान

महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी समाज आमने सामने आलाय….. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे…. तर दुसरीकडे आपल्या आरक्षणात वाटेकरी आल्यास आपलं कसं होणार? या विचाराने ओबीसी समाजात अस्वस्थता पसरली आहे. महाराष्ट्रातील या एकूण सामाजिक राजकीय परिस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar On Maratha OBC Dispute) यांनी अखेर मोठ विधान केलं आहे… महाराष्ट्रातील सामाजिक ऐक्य जपण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला आम्ही तयार आहोत . मात्र सामाजिक ऐक्य हे जपलेच पाहिजे असे विधान शरद पवारांनी केला आहे. नाशिक येथील दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या उद्घाटनाच्या वेळी शरद पवार बोलत होते.

काय म्हणाले शरद पवार? Sharad Pawar On Maratha OBC Dispute

आपल्या भाषणात शरद पवार म्हणाले, सध्या महाराष्ट्राचं चित्र वेगळं होत चाललंय. महाराष्ट्रात सामाजिक ऐक्याची वीण उसवली जात आहे, असं वाटतंय.  समतेचा विचार अस्थिर होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, वाटेल ती किंमत देऊ पण महाराष्ट्र एकसंघ ठेऊ, महाराष्ट्रातील सर्व जाती-धर्मातील लोकांना एकत्र कसे राहतील आणि महाराष्ट्राचा लौकिक यशवंतराव चव्हाण साहेबांनी, दादासाहेब गायकवाड यांनी घालून दिला होता तो पुन्हा येण्यासाठी जे काही करावं लागेल ते आपण एकत्र करू असा निर्धार शरद पवारांनी केला. सध्या राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी सुरू असलेल्या संघाच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या (Sharad Pawar On Maratha OBC Dispute) विधानाला मोठं महत्त्व आहे.

दादासाहेब गायकवाड यांच्या बद्दल काय म्हणाले?

शरद पवार पुढे म्हणाले, हा अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आहे. दादासाहेब गायकवाड यांचे जीवन गंमतीचा कालखंड आहे. ते संसदेत गेले, व्यक्तिगत जीवनात ते पोस्टात कारकून होते. पाकिस्तान झालेले नव्हते. हिंदुस्थान अखंड होते. तेव्हा कराचीत नोकरीला होते. नोकरी सोडून आल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत भेट झाली. दादासाहेब गायकवाड यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रोत्साहन दिलं, त्यामुळे ते नोकरी सोडून समाजकारण आणि राजकारणात आले, बाबासाहेबांनी पक्ष काढला होता, दादासाहेब गायकवाड यांना त्या पक्षातून उमेदवारी मिळाली होती, आणि ते निवडून देखील आले. तेव्हाचा काळ वेगळा होता, तो संयुक्त महाराष्ट्राचा काळ होता. त्या चळवळीमध्ये नाशिकचा वाटा मोठा आहे. नंतर महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. तेव्हा महाराष्ट्राचं नेतृत्व यशवंतराव चव्हाण करत होते.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews