Marathi News

मुंबई महापालिका निवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे सुतोवाच; मविआचं काय होणार?

Written by:Rohit Shinde
Published:
मुंबई महापालिका निवडणुकीबाबत आता खुद्द ज्येष्ठ नेते शरद पवारांनी भाष्य केलं आहे. त्यांनी महाविकास आघाडी मुंबईत लढेल की नाही, यावर देखील आपलं मत मांडले.
मुंबई महापालिका निवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे सुतोवाच;  मविआचं काय होणार?

सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच स्थानिक स्वराज्य संस्था तसेच महापालिका निवडणुका घेण्याबाबत निर्देश दिले होते. त्यानंतर आता महापालिका निवडणूक कधी लागणार? महापालिका महाविकास आघाडी एकत्रित लढणार? असे प्रश्न सातत्याने विचारले जात होते. त्यावर आता खुद्द शरद पवारांनी भाष्य केले आहे.

लवकरच निवडणुका लागणार -शरद पवार

सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत.  आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार असल्याचे संकेत दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता निवडणुका घेणे अपरिहार्य असून, येत्या तीन महिन्यांत निवडणुका लागण्याची शक्यता शरद पवारांनी वर्तवली आहे. यावेळी शरद पवारांनी महाविकासाआघाडीसोबत निवडणूक लढवणार की नाही, याबद्दलही भाष्य केले. शऱद पवार महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवण्यासाठी सकारात्मक आहेत.

यावेळी शरद पवारांनी उद्धव ठाकरे आणि मुंबई महापालिकांवर भाष्य केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक बाबत आम्ही अजून काही चर्चा केली नाही. आमचा अंदाज असा आहे की सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. त्यामुळे आता निवडणूक लावण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे साधारपणे 3 महिन्यात निवडणूक लागेल. त्यात आम्ही सर्वजण सहभागी होऊ, असे शरद पवार म्हणाले.

‘मविआबाबत लवकरच निर्णय होणर’

यावेळी त्यांना इतर पक्षांसोबत चर्चा करण्याबद्दल विचारणा करण्यात आली. आमच्या इतर घटक पक्षाशी आम्ही चर्चा केलेली नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे नेतृत्व करत असलेली शिवसेना आहे. आम्ही एकत्र बसू आणि एकत्र निवडणुकीला सामोरी जाता येईल का, याबद्दल चर्चा करु. पण आमची एकत्र लढण्याची इच्छा आहे, असे शरद पवारांनी सांगितले.

मुंबईच्या संदर्भात बोलताना पवारांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे प्राबल्य मान्य केले. “मुंबईत आमच्या सर्वांपेक्षा उद्धव ठाकरेंचे शक्तीस्थान जास्त आहे. मुंबईत उद्धव ठाकरे यांचे प्राबल्य आहे. त्यामुळे त्यांना विचारात घ्यावे लागेल,” असे शरद पवारांनी नमूद केले. मुंबईतील जागेवाटपात शिवसेनेची भूमिका महत्त्वाची असेल असे संकेत दिले. महाविकासआघाडी म्हणून काही चर्चा झालेली नाही.

पण मुंबईत आमच्या सर्वांपेक्षा उद्धव ठाकरेंचे शक्तीस्थान जास्त आहे. मुंबईत उध्दव ठाकरे यांचे प्राबल्य आहे. त्यामुळे त्यांना विचारात घ्यावं लागले, असेही शरद पवारांनी म्हटले. त्यामुळे मुंबईतील ठाकरेंचे प्राबल्य लक्षात घेता या निवडणुका मविआ एकत्रित लढण्याची शक्यता आहे.

 

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews