Shetkari Karjmafi : शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा महाराष्ट्रात अजूनही चर्चेत आहे. सरकारने काही दिवसांपूर्वीच आम्ही 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी करून असं म्हटलं आहे. मात्र त्यासाठी एक समिती गठीत करण्यात आल्याने नेमकी कोणत्या शेतकऱ्यांची कर्ज माफी होणार आणि कोणाला फायदा होणार याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. आज महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा गाजला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा करत शेतकऱ्यांना आश्वस्त केलं
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? Shetkari Karjmafi
शेतकरी कर्जमाफीबाबत राज्य सरकारनं वचन दिलं आहे. आपल्यावर अतिृष्टीचा ताण आला म्हणून थोडा अर्थव्यवस्था अडचणीत आहे. पण कर्जमाफी करणार आहोत. शेतकरी कर्जमाफीसाठी आम्ही समिती तयार केली आहे. आमचा उद्देश हाच आहे की शेतकरी कर्जमाफीचा (Shetkari Karjmafi) फायदा हा बँकांना होऊ नये तो फक्त शेतकऱ्यांनाच व्हावा. २०१७ व २०२० मध्ये कर्जमाफी केली तरी शेतकरी कर्जमाफी मागतो. याचा अर्थ आपल्या नियोजनात आणि कर्जमाफी आणि शेतकऱ्याच्या परिस्थितीतही अडचण आहे. यावर उपाययोजना एकदम येणार नाही. पण काहीतरी करावे लागेल. त्यादृष्टीने समिति काम करत आहे. १ जुलै पर्यंत सर्व घोषणा आपण करू, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली.
वीजेचे दर कमी होणार
दरम्यान , वीजेचे दर आता कमी होणार आहेत. गेल्या २० वर्षात वीजेचे दर हे दरवर्षी ९ टक्क्यांनी वाढायचे. मात्र इथून पुढचे पाच वर्षे दरवर्षी २ टक्क्यांनी कमी येणार. काही वेळा बिल वाढून येते. त्यात इंधन कर समायोजन हे वर्षाच्या शेवटी व्हायचं पण आता ते प्रत्येक महिन्याला येतं. त्यामुळे कधी ३० पैशांनी वाढतं आणि कधी ४० पैशांनी वीज बिल वाढतं. कमी झाल्यावर कोणी बोलत नाही पण वाढल्यावर त्याची चर्चा होते. पुढच्या सहा महिन्यात १ लाख मेगावॅट पंप स्टोरेजचे करार होतील अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.






