Marathi News

देश संकटात असताना मराठी भाषिकांचे कैवारी परदेशात फोटोग्राफीत मग्न, शिवसेना उपनेते संजय निरुपम यांची उबाठावर टीका

Written by:Astha Sutar
Published:
मंगळवारी कश्मीर मध्ये पहलगाम येथे अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 27 लोकांनी आपला जीव गमावला आणि या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संताबची लाट उसळली तसेच देशांमध्ये शोकाकुल वातावरण झाले. असताना केंद्र सरकारने पाकिस्तानशी राजनीतिक संबंध तोडून टाकण्याचे मोठे निर्णय घेतले तर पाकिस्तान विरोधात लष्करी कारवाई केली आहे. तसेच दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त करून स्थानिकांविरुद्ध कारवाई करायला हवी.
देश संकटात असताना मराठी भाषिकांचे कैवारी परदेशात फोटोग्राफीत मग्न, शिवसेना उपनेते संजय निरुपम यांची उबाठावर टीका

मुंबई – मंगळवारी काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात 27 पर्यटकांना आपला जीव गमावावा लागला आहे. टीआरएफ दहशतवादी संघटना आहे, ती पाकिस्तानशी संबंधित असल्याचे बोलले जाते. या हल्ल्यानंतर देशभरातून संतापाची लाट उसळत आहे. हल्ल्यानंतर देशभरात शोकाकुल वातावरण असताना मराठी भाषिकांचे कैवारी म्हणवणारे ढोंगी नेते कुटुंबासह विदेशात फोटोग्राफी करण्यात मग्न आहेत, असा घणाघाती टिका शिवसेना प्रवक्ते आणि उपनेते संजय निरुपम यांनी उबाठावर केला.

सहलीच्या आनंदात मग्न…

दरम्यान, निरुपम पुढे म्हणाले की, त्यांची आवड वाइल्डलाईफ फोटोग्राफी, टुरिझम असून ते परदेशी खाद्यपदार्थ खाण्यात मग्न आहेत. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातील पर्यटकांबद्दल संवेदना व्यक्त करण्यात वेळ मिळत नाही, अशी खोचक टिका निरुपम यांनी उबाठा गटावर केली. काश्मीरमध्ये महाराष्ट्राचे जवळपास २००० पर्यटक थांबलेले आहेत. महायुती सरकारकडून त्यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरु झाले. शिवसेनेकडून स्टार एअरलाईन्स आणि अकासा एअरलाईन्सकडून प्रत्येकी दोन फेऱ्या झाल्या. यातून ५२० पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्यात आले. महाराष्ट्रातील मराठी पर्यटकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावून गेले. मात्र मराठींचे कैवारी म्हणणारे ढोंगी राजकारणी मात्र युरोपात कौटुंबिक सहलीसाठी गेले आहेत, अशी खोचक टीका निरुपम यांनी उबाठावर केली.

दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करायला हवेत…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या श्रीनगर दौऱ्यावरवर काहीजणांनी आक्षेप घेतला. महाराष्ट्रातील पर्यटकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी आणि त्यांना आधार देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगरला गेले होते. शिंदे स्वत: तिथे लक्ष घालून पर्यटकांची परतीच्या प्रवासाची व्यवस्था केली, मात्र शिंदे यांच्या दौऱ्यावर टीका करणाऱ्यांची कोती वृत्ती दिसून ये आहे. दरम्यान, केंद्र सरकारने पाकिस्तानशी राजनैतिक संबध तोडून टाकण्याचे मोठे निर्णय घेतले. त्याबद्दल सरकारचे अभिनंदन करायला हवे. मात्र यावर न थांबता केंद्र सरकारने पाकिस्तान विरोधात लष्करी कारवाई करावी, पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करायला हवेत, दहशतवाद्यांना आसरा देणाऱ्या स्थानिकांविरोधात सरकारने कारवाई करायला हवी, असे निरुपम म्हणाले.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews