Afgan Cricketers Death: धक्कादायक! पाकच्या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानचे 3 क्रिकेटपटू ठार

Written by:Rohit Shinde
Published:
पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात तीन अफगाण क्रिकेट खेळाडू ठार झाले आहे. ज्यामुळे आता अफगाणिस्तानने पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार दिला आहे.
Afgan Cricketers Death: धक्कादायक! पाकच्या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानचे 3 क्रिकेटपटू ठार

क्रिकेट विश्वातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात तीन अफगाण क्रिकेट खेळाडू ठार झाले आहे. ज्यामुळे आता अफगाणिस्तानने पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये नोव्हेंबर महिन्यात होणारी टी 20 मालिका रद्द करण्यात आली आहे. या घटनेवर जगभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

नेमकं शुक्रवारी काय घडलं?

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमावर्ती भागात सध्या तणावाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तानकडून शुक्रवारी रात्री अफगाणिस्तानवर हवाई हल्ला करण्यात आला होता. पाकिस्तानी सैन्याने आग्नेय पक्तिका प्रांतातील अर्गुन आणि बारमल जिल्ह्यात हवाई हल्ला केला आणि या हल्ल्यात तीन अफगाणी खेळाडू ठार झाले. हल्ल्यात तीन क्लब-स्तरीय क्रिकेट खेळाडू ठार झाले आणि इतर चार जण जखमी आहे. हे खेळाडू पक्तिका येथील शराणा येथे सामना संपवून अर्गुनला परतत असताना हल्ला झाला.

“पाकसोबत क्रिकेट नाहीच…”

पक्तिका प्रांतात पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तान क्रिकेटच मोठं नुकसान केलं आहे. या हल्ल्यात तीन स्थानिक क्लब क्रिकेटरचा मृत्यू झाला. चार खेळाडू जखमी झाले. कबीर, सिबगतुल्लाह आणि हारून अशी मरण पावलेल्या क्रिकटर्सची नावं आहेत. त्याशिवाय अन्य पाच लोकांचा मृत्यू झाला. हे खेळाडू प्रांतीय राजधानी शराना येथे एक स्थानिक क्रिकेट टुर्नामेंट खेळून परतीच्या वाटेवर असताना ही घटना घडली. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने या बद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.

पक्तिकाच्या हवाई हल्ल्यात देशांतर्गत खेळाडूंचा मृत्यू झाल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी पाकिस्तान आणि श्रीलंकेसोबत तिरंगी मालिकेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. ही ट्राय सीरीज 20 नोव्हेंबरपासून सुरु होणार होती.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews