भारतीय क्रिकेट चाहत्यांना धक्का देणारी एक बातमी समोर येत आहे. खरंतर अलीकडेच विराट कोहली, रोहित शर्मा यांच्या टेस्टमधील निवृत्तीने अनेकांना धक्का दिला होता. त्यानंतर आता टीम इंडियाचा कसोटी क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराने क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती जाहीर केली आहे. या निर्णयामुळे चाहत्यांना मात्र काहीसा धक्का बसला आहे. चेतेश्वर पुजाराने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. चेतेश्वर पुजाराची कारकिर्द जवळपास वीस वर्षांची होती. या वीस वर्षांत पुजाराने 13 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये व्यतीत केली.
चेतेश्वर पुजाराची क्रिकेटमधून निवृत्ती
टीम इंडियाचा कसोटी क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराने क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती जाहीर केली आहे. चेतेश्वर पुजाराची कारकिर्द जवळपास वीस वर्षांची होती. या वीस वर्षांत पुजाराने 13 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये व्यतीत केली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सन 2005 मध्ये पुजाराने पहिला सामना खेळला होता. हा सामना सौराष्ट्र आणि विदर्भ यांच्यात होता. पुजाराने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील अखेरचा सामना फेब्रुवारी 2025 गुजरात विरुद्ध खेळला होता. सन 2010 मध्ये पुजाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. बंगळुरूत ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना होता. हा सामना कसोटीतील होता. यानंतर सन 2013 मध्ये बुलावायो येथे झिम्बाम्बे विरुद्धच्या सामन्यातून पुजाराने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
शेवटी पुजाराची भावनिक पोस्ट
पुजारानं आपल्या शेवटच्या पोस्टमध्ये लिहिलं, “राजकोटमधील एका छोट्या शहरातील रहिवासी, मी लहानपणी माझ्या पालकांसोबत ताऱ्यांना स्पर्श करण्याचं स्वप्न पाहिलं होतं आणि भारतीय क्रिकेट संघाचा भाग होण्याचं स्वप्न जपलं होतं. मला तेव्हा माहित नव्हतं की हा खेळ मला इतकं काही देईल. अनमोल संधी, अनुभव, उद्देश, प्रेम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या राज्याचं आणि या महान राष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्याची संधी. मी बीसीसीआय आणि सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे आभार मानू इच्छितो, ज्यांनी माझ्या क्रिकेट कारकिर्दीत मला संधी आणि पाठिंबा दिला. मी गेल्या काही वर्षांपासून ज्या संघांचा, फ्रँचायझींचा आणि काउंटी संघांचा भाग आहे त्यांचाही मी आभारी आहे.” अशा शब्दांत पुजारा व्यक्त झाला.
Wearing the Indian jersey, singing the anthem, and trying my best each time I stepped on the field – it’s impossible to put into words what it truly meant. But as they say, all good things must come to an end, and with immense gratitude I have decided to retire from all forms of… pic.twitter.com/p8yOd5tFyT
— Cheteshwar Pujara (@cheteshwar1) August 24, 2025






