टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दीप्ती शर्माने रचला इतिहास, मोडला सर्वात मोठा जागतिक विक्रम

Published:
दीप्ती शर्माने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये १५० आंतरराष्ट्रीय टी-२० विकेट्स घेणारी ती पहिली भारतीय गोलंदाज ठरली आहे.
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दीप्ती शर्माने रचला इतिहास, मोडला सर्वात मोठा जागतिक विक्रम

भारतीय महिला संघ आणि श्रीलंकेच्या महिला संघातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना काल रात्री, ३० डिसेंबर २०२५ रोजी तिरुअनंतपुरम येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झाला. या सामन्यात भारतीय महिला संघाची स्टार अष्टपैलू दीप्ती शर्माने इतिहास रचला.

पहिल्या क्रमांकाची टी-२० गोलंदाज दीप्ती शर्मा ही या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज ठरली आहे. तिरुवनंतपुरममध्ये खेळल्या गेलेल्या पाचव्या टी-२० सामन्यात एकाच विकेटसह दीप्तीने ऑस्ट्रेलियन गोलंदाज मेगन शटचा विश्वविक्रम मोडला. तिने श्रीलंकेच्या डावाच्या १४ व्या षटकात नीलाक्षी सिल्वाला बाद केले. दीप्तीचा हा टी-२० मधील १५२ वा विकेट होता, ज्याने मेगन शटचा १५१ विकेटचा विक्रम मागे टाकला.

दीप्ती शर्मा १५० आंतरराष्ट्रीय टी-२० विकेट्स घेणारी पहिली भारतीय गोलंदाज

श्रीलंकेविरुद्धच्या पाचव्या सामन्यापूर्वी, दीप्ती सर्वाधिक विकेट्सच्या बाबतीत मेगन शूटची बरोबरी केली होती, दोघींनीही प्रत्येकी १५१ विकेट्स घेतल्या होत्या. यासोबतच, दीप्ती शर्माने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये १५० आंतरराष्ट्रीय टी-२० विकेट्स घेणारी ती पहिली भारतीय गोलंदाज ठरली आहे.

गेल्या आठवड्यात श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात तिने कविशा दिलहारीला बाद करून हा विक्रम केला. त्याच सामन्यात दीप्ती शर्मानेही इतिहास रचला. टी-२० क्रिकेट इतिहासात ती १,००० पेक्षा जास्त धावा करणारी आणि १५० पेक्षा जास्त विकेट्स घेणारी पहिली खेळाडू (पुरुष किंवा महिला) ठरली. दीप्तीने आता टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १,१०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. तिची सरासरी २३.४० आहे आणि तिचा स्ट्राइक रेट १०४.२६ आहे. या काळात तिने दोन अर्धशतके देखील झळकावली आहेत.

महिला टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज

१. दीप्ती शर्मा (भारत) – १५२ विकेट्स

२. मेगन शट (ऑस्ट्रेलिया) – १५१ विकेट्स

३. निदा दार (पाकिस्तान) – १४४ विकेट्स

४. हेन्रिएट इशिमवे (रवांडा) – १४४ विकेट्स

५. सोफी एक्लेस्टोन (इंग्लंड) – १४२ विकेट्स

Follow Us :GoogleNews