टीम इंडियाची स्टार फलंदाज स्मृती मानधनाची एकूण संपत्ती किती? जाणून घ्या

Published:
टीम इंडियाची स्टार फलंदाज स्मृती मानधनाची एकूण संपत्ती किती? जाणून घ्या

टीम इंडियाची स्टार फलंदाज स्मृती मानधना काल शुक्रवारी (१८ जुलै) तिचा २८ वा वाढदिवस साजरा केला. चाहत्यांनी तिला सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या. तसेच, गुगलवर तिच्याशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे शोधली. जसे की, ‘स्मृती मानधना हिची एकूण संपत्ती किती आहे?’ ‘तिला एका सामन्यासाठी किती पैसे मिळतात?’ जर तुमच्या मनातही असेच प्रश्न असतील, तर या प्रश्नांची उत्तरं आपण इथे जाणून घेणार आहोत.

स्मृती मानधना हिची  एकूण सुमारे ३२ ते ३३ कोटी रुपये आहे. तिचे वार्षिक उत्पन्न ५ ते ६ कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचे मानले जाते.

उत्पन्नाचे प्रमुख स्रोत कोणते आहेत?

बीसीसीआय आणि डब्ल्यूपीएल करार

सामना शुल्क (कसोटी, एकदिवसीय, टी२०)

ब्रांड एंडोर्समेंट्स

स्पॉन्सरशिप डील्स

बीसीसीआयकडून मानधनाला वार्षिक रिटेनरशिप आणि सामना शुल्क मिळते, तर तिची लोकप्रियता डब्ल्यूपीएलमध्ये म्हणजेच महिला प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक आहे.

आरसीबीसोबत कोटींचा करार झाला

स्मृती मानधन ही महिला प्रीमियर लीगमध्ये (डब्ल्यूपीएल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) ची कर्णधार आहे. आरसीबीने तिच्यासोबत ३.४० कोटी रुपयांचा मोठा करार केला आहे. इतकेच नाही तर २०२४ च्या डब्ल्यूपीएलमध्ये स्मृतीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ विजेता बनला.

ती टीम इंडियाकडून किती सामने खेळले?

आतापर्यंत, स्मृती मानधनाने भारतासाठी एकूण २६३ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यात

७ कसोटी

१०३ एकदिवसीय

१५३ टी२० आंतरराष्ट्रीय सामने

इतका अनुभव आणि कामगिरी तिला भारतातील सर्वात विश्वासार्ह खेळाडूंपैकी एक बनवते.

स्मृती मानधना किती ब्रँड एंडोर्स करते?

स्मृती मानधनाचा चेहरा आता केवळ क्रिकेटच्या मैदानावरच नाही तर मोठ्या ब्रँडच्या जाहिरातींमध्येही दिसतो. ती अनेक मोठ्या ब्रँड्सना प्रोत्साहन देते.

Nike

Puma

Bournvita

Dabur Healthcare

Assorted Food & Beverage Brands

ती या ब्रँड्समधून खूप कमाई करते आणि यामुळे तिची एकूण संपत्ती आणखी वाढते

ती भविष्यात टीम इंडियाची कर्णधार होईल?

सध्या, स्मृती टीम इंडियाची उपकर्णधार आहे, परंतु WPL मधील तिच्या कर्णधारपदाकडे पाहता, असे मानले जाते की येणाऱ्या काळात ती भारतीय महिला संघाची नियमित कर्णधार देखील बनू शकते.

Follow Us :GoogleNews