GST Reform मुळे IPL पाहणं झालं महाग, तिकिटांचे दर किती वाढले? आंतरराष्ट्रीय सामन्यांवरही परिणाम होणार का? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Published:
GST Reform मुळे IPL पाहणं झालं महाग, तिकिटांचे दर किती वाढले? आंतरराष्ट्रीय सामन्यांवरही परिणाम होणार का? जाणून घ्या संपूर्ण माहिती

आता प्लेऑफचा थरारचा रंगणार, सामने कधी, किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या

वस्तू आणि सेवा कराच्या (GST Reform) नवीन दरांचा क्रिकेटवरही परिणाम होणार आहे. चाहत्यांना आता स्टेडियममध्ये जाऊन आयपीएल सामने पाहणे महाग होणार आहे. बुधवारी (३ सप्टेंबर) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली आयपीएल तिकिटांवर जीएसटी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचा परिणाम आयपीएल २०२६ मध्ये दिसून येईल. तिकिटांच्या किमती किती वाढतील? आता त्यावर किती कर लावला जाईल ते आपण जाणून घेणार आहोत.

IPL तिकिटांवर किती जीएसटी आकारला जाईल?

बुधवारी झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत इंडियन प्रीमियर लीग सामन्यांच्या तिकिटांवर ४० टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत तो २८ टक्के होता. म्हणजेच आयपीएल सामन्यांच्या तिकिटांवर १२ टक्के जीएसटी वाढवण्यात आला आहे. याचा परिणाम क्रिकेट चाहत्यांच्या खिशावर होईल.

समजा तुम्ही आयपीएलचे तिकीट खरेदी केले आणि त्याची किंमत १००० रुपये निश्चित केली आहे. पूर्वी यावर २८ टक्के जीएसटी होता, त्यामुळे तुम्हाला त्यासाठी एकूण १२८० रुपये द्यावे लागत होते, परंतु आता नवीन दरांनुसार तुम्हाला त्यासाठी १४०० रुपये द्यावे लागतील. याचा अर्थ आता चाहत्यांना १२० रुपये जास्त द्यावे लागतील. अशाप्रकारे, जर तिकिटाची किंमत २००० रुपये असेल, तर त्यावर ८०० रुपये जीएसटी आकारला जाईल आणि एकूण किंमत २८०० रुपये होईल.

त्याचा परिणाम आयपीएल २०२६ दरम्यान दिसून येईल. जर आयोजकांनी तिकिटांच्या किमतीत कोणतीही सवलत दिली नाही किंवा वाढवली नाही, तर स्टेडियममध्ये चाहत्यांची कमतरता भासू शकते. भारतात क्रिकेटची पूजा केली जाते आणि क्रिकेटप्रेमी आयपीएलला उत्सवासारखे साजरे करतात. आयपीएल दरम्यान प्रत्येक सामन्यात तिकिटांची मागणी वाढल्याचे दिसून आले आहे. आता नवीन जीएसटी दरांनंतर तिकिटांसाठी अशीच गर्दी होईल की नाही हे पाहणे मनोरंजक ठरेल.

आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या तिकिटांवरही जीएसटी वाढेल का?

नाही. मान्यताप्राप्त स्पर्धांच्या तिकिटांवर जीएसटी वाढवलेला नाही. राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळांसाठी ५०० रुपयांच्या तिकिटांवर जीएसटी आकारला जाणार नाही, तर या किमतीपेक्षा जास्त किमतीच्या तिकिटांवर १८ टक्के जीएसटी पूर्वीप्रमाणेच लागू राहील.

Follow Us :GoogleNews