‘डिप्रेशनमध्ये गेलो, आत्महत्या करणार होतो..पण, ‘ क्रिकेटर युजवेंद्र चहलची घटस्फोटाची इनसाईड स्टोरी

Written by:Rohit Shinde
Published:
भारताचा स्टार क्रिकेटर युजवेंद्र चहलने आपल्या घटस्फोटाची इनसाईड स्टोरी एका मुलाखतीत सांगितली आहे. नेमका युजवेंद्र चहल काय म्हणाला, ते समजून घेऊ...
‘डिप्रेशनमध्ये गेलो, आत्महत्या करणार होतो..पण, ‘ क्रिकेटर युजवेंद्र चहलची घटस्फोटाची इनसाईड स्टोरी

भारताचा स्टार क्रिकेटर युजवेंद्र चहल गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. यंदाच्या वर्षी मार्च महिन्यात युजवेंद्र आणि धनश्री यांनी घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर क्रिकेटरच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या. वर्षाच्या सुरुवातील चहल याच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आणि घटस्फोटाच्या चर्चांना देखील उधाण आलं होतं. याकारणामुळे युजवेंद्र याचं मानसिक तणाव देखील वाढलं होतं. एवढंच नाही तर, स्वतःला संपवण्याचा विचार देखील त्याने केलेला. आता धनश्री वर्मासोबतच्या घटस्फोटाची इनसाईड स्टोरी युजवेंद्रने एका मुलाखतीत सांगितली आहे.

धोकेबाज म्हणून आरोप, पण सावरलो -चहल

घटस्फोटाच्या घटनेनंतर या घटनेनंतर चहलवर “धोखेबाज” असल्याचे आरोप झाले, ज्यामुळे तो खूपच मानसिक तणावात गेला. अलीकडेच एका पॉडकास्ट मुलाखतीत राज शमानीशी बोलताना चहलने आपल्या मनातील भावना उघडपणे व्यक्त केल्या. त्याने स्पष्टपणे सांगितले की, घटस्फोटानंतर लोकांनी न कळत, न विचारत त्याला “धोखेबाज” म्हणायला सुरुवात केली. तो म्हणाला की, “मी कधीच कुणाला धोखा दिला नाही. मी कायम एकनिष्ठ राहिलो आहे. माझ्यासारखा प्रामाणिक माणूस शोधून सापडणार नाही. लोकांनी माझी बाजू ऐकून घेतली नाही, आणि थेट मत बनवतात. मला या गोष्टीचा फार त्रास झाला.”

‘डिप्रेशनमध्ये आत्महत्या करायचा विचार…’

“लोकांना वाटत होतं की मी इतका आनंदी कसा काय आहे? घटस्फोटानंतर डिप्रेशनमध्ये का नाही गेलो? रडत का नाही? सोशल मीडियावर दु:खी फोटो का नाही टाकले? पण ती माझी वैयक्तिक आयुष्य आहे. काही गोष्टी मला आनंद देतात, त्या मी करणारच.”

मात्र चहलने हेही मान्य केलं की, बाहेरून शांत आणि आनंदी दिसणारा तो, आतून तुटत चालला होता. तो म्हणाला, “त्या काळात मी डिप्रेशनमध्ये होतो. मला अ‍ॅन्झायटी अटॅक्स यायचे. हे मी आज पहिल्यांदाच उघडपणे बोलतोय. माझ्या मनात आत्महत्या करण्याचे विचार येत होते. मी माझ्या जवळच्या लोकांबद्दल खूप विचार करायचो. मी कुणाला सांगितलं नाही. 3-4 महिने मी क्रिकेटपासून पूर्णपणे दूर होतो. मला स्वतःसाठी वेळ हवा होता. वाटायचं, सगळं असूनही काहीतरी पोकळी आहे, मग अशा जीवनाचा उपयोग काय?” असं चहल म्हटला.

चहलच्या व्यक्तीगत आयुष्यातील या घडामोडी समोर आल्याने आणि घटस्फोटाची इनसाईड स्टोरी समजल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये मात्र एकच सन्नाटा पसरला आहे. काहीजण सोशल मीडियावर याबाबत व्यक्त देखील होत आहेत. तसेच युजवेंद्रला त्यांचे समर्थन असल्याचे देखील सांगताना काही चाहते दिसत आहेत.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews