केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जीएसटी कौन्सिलने बुधवारी देशाच्या अप्रत्यक्ष कर रचनेत काही मोठे बदल मंजूर केले. नवीन कर रचनेमुळे सर्वसामान्य जनतेला अनेक जीवनावश्यक वस्तू आता कमी किमतीत उपलब्ध होणार आहेत. शेतीच्या उपकरणापासून ते जीवनावश्यक औषधांपर्यंत वस्तूंवरील कर कमी झाल्यामुळे देशवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र एकीकडे हे आनंदाचे वातावरण असताना दुसरीकडे क्रिकेटप्रेमींना मात्र सरकारने मोठा झटका दिला आहे. याचं कारण म्हणजे इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल तिकिटांवर सरकारने तब्बल 40% जीएसटी लावला आहे. IPL Ticket GST
देशात आयपीएल ची मोठी क्रेझ –
देशातील सर्वात आघाडीची क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी इंडियन प्रीमियर लीग ज्याला आपण आयपीएल म्हणतो त्या आयपीएलचा भारतात एक वेगळाच दबदबा आहे. जगभरातून अनेक क्रिकेट खेळाडू आयपीएल निमित्त भारतात येतात… दोन महिने मनसोक्त क्रिकेट खेळतात. भारतीय चाहतेही त्यांना अक्षरशः डोक्यावर येतात….. आयपीएलची क्रेझ मोडून काढेल अशी दुसरी क्रिकेट लीग सध्या तरी जगात नाही…. आयपीएल तिकिटाच्या माध्यमातून बीसीसीआय दरवर्षी करोड रुपये कमवते…. क्रिकेटप्रेमी सुद्धा वारेमाप पैसा खर्च करून आयपीएलचे सामने बघायला स्टेडियममध्ये जातात. मात्र आता आयपीएल तिकिटांवर अतिरिक्त जीएसटी लागल्याने या चाहत्यांना मोठा दणका बसलाय.
आयपीएल तिकीट का महागले? IPL Ticket GST
यापूर्वी आयपीएलच्या तिकिटावर 28 टक्के जीएसटी (IPL Tickets GST) आकारला जात होता मात्र आता जीएसटी 40% वर नेण्यात आला आहे. सरकारने आयपीएल आणि तत्सम उच्च-मूल्य असलेल्या क्रीडा स्पर्धांना ‘अनावश्यक आणि लक्झरी श्रेणी’मध्ये ठेवले आहे. म्हणून, त्यांना कॅसिनो, रेस क्लब आणि लक्झरी वस्तूंसारख्याच कर स्लॅबमध्ये ठेवण्यात आले आहे. उदाहरण द्यायचं झालं तर समजा, तुम्ही 1000 रुपयाचे तिकीट घेतलं तर त्यावर आधी 28 टक्के जीएसटीनुसार 1280 रुपये द्यावे लागायचे. मात्र आता हाच टॅक्स 40% झाल्याने तुमच्या खिशातून 1400 रुपये जातील. मात्र हा 40% टॅक्स फक्त आयपीएल सामन्यांच्या तिकिटांसाठीच असेल. जेव्हा भारतीय संघाची आंतरराष्ट्रीय मॅच असेल तेव्हा मात्र आधीप्रमाणे 18 टक्के कर आकारण्यात येईल.






