Marathi News

Jemimah Rodrigues On Periods : Periods मध्ये क्रिकेट खेळताना काय आपबीती येते? Jemima Rodrigues ने सांगितल्या वेदना

Published:
मासिक पाळी दरम्यान काही वेळा आपल्याला चालता येत नाही. मात्र आम्ही वेदना सहन करतो. कारण आम्हाला खेळ आवडतो आणि आम्ही आमच्या देशासाठी खेळतो
Jemimah Rodrigues On Periods : Periods मध्ये क्रिकेट खेळताना काय आपबीती येते? Jemima Rodrigues ने सांगितल्या वेदना

भारतीय क्रिकेट संघाच्या महिलांनी यंदा कमाल करत प्रथमच आयसीसी विश्वचषक स्पर्धेवर आपलं नाव कोरले. या स्पर्धेतील ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उपांत्य सामन्यात धडाकेबाज खेळी करून भारताला अशक्यप्राय विजय मिळवून देणारी Jemima Rodrigues सर्वांच्याच लक्षात राहील. मूळची मुंबईची असणारी जेमिमा (Jemimah Rodrigues On Periods) अनेक संघर्ष पार करून आजवर इथपर्यंत पोचली आहे. आज संपूर्ण देशात जेमीमा रॉड्रिग्जचे कौतुक होत असताना तिचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ मध्ये मासिक पाळीत क्रिकेट खेळताना महिलाना काय यातना सहन कराव्या लागतात यावर तिने प्रकाश टाकला आहे.

काय म्हणाली जेमीमा रॉड्रिग्ज (Jemimah Rodrigues On Periods)

व्हिडिओमध्ये, जेमिमा मासिक पाळीच्या वेळी महिला खेळाडूंना होणाऱ्या शारीरिक वेदना आणि भावनिक संघर्षांबद्दल स्पष्टपणे बोलते. ती म्हणते मासिक पाळी दरम्यान काही वेळा आपल्याला चालता येत नाही. मात्र आम्ही वेदना सहन करतो. कारण आम्हाला खेळ आवडतो आणि आम्ही आमच्या देशासाठी खेळतो. जेमीमा रॉड्रिग्जच्या या उत्तरात तिचे देशप्रेम आणि क्रिकेट या खेळाप्रति असलेली आवड अधोरेखीत झाली. Jemimah Rodrigues On Periods

जेमिमा रॉड्रिग्जची २०२५ वर्ल्डकप मधील कामगिरी

जेमिमा रॉड्रिग्ज मैदानात एक विश्वासू फलंदाज म्हणून ओळखली जाते. तिसऱ्या क्रमांकावर खेळताना तिने भारतीय संघासाठी खोऱ्याने धावा काढल्या आहेत. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत ती टीम इंडियासाठी हिरो ठरली. आपल्या पहिल्याच वन डे विश्वचषकात उपांत्य फेरीत खेळताना जेमिमानं 134 चेंडूंमध्ये 14 चौकारांसह नाबाद 127 धावांची खेळी केली. जेमिमाचं आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमधलं हे तिसरंच शतक ठरलं. विशेष बाब म्हणजे जेमिमाच्या या ऐतिहासिक खेळीमुळेच टीम इंडिया फायनलला पोचली आणि पुढे अंतिम फेरीत विजय मिळवून चॅम्पियन बनली.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews