रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेडदरम्यान चिन्नास्वामी स्टेडियमजवळ अचानक चेंगराचेंगरी झाल्याचा प्रकार समोर आला होता. या दुर्घटनेत अकरा जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश होता. त्याशिवाय ५० हून जास्त लोक जखमी झाले. चिन्नास्वामी स्टेडियमच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ हा अपघात घडला. त्यानंतर आरसीबी संघ व्यवस्थापनावर टीकेची झोड उठविण्यात आली होती. आता आरसीबी संघ व्यवस्थापनाने मृतांच्या कुटुंबियांनी मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला आहे.
मृतांच्या कुटुंबियांना 25 लाखांची मदत
आयपीएल 2025 चे विजेतेपद मिळवून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) संघाचा पहिला ऐतिहासिक जल्लोष एका दुःखद घटनेने काळवंडला होता. 4 जून 2025 रोजी एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या जल्लोषादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 11 चाहत्यांचा मृत्यू झाला, तर 33 जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर तब्बल तीन महिन्यांनी आरसीबी व्यवस्थापनाने मोठा निर्णय घेतला आहे. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा शनिवारी अधिकृतपणे करण्यात आली.
आरसीबीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटलं की, “4 जून 2025 हा आमच्यासाठी फारच दुःखद दिवस ठरला. त्या दिवशी आम्ही आमच्या आरसीबी परिवारातील 11 सदस्य गमावले. ते फक्त चाहते नव्हते, तर आमच्या संघाचा, शहराचा आणि संपूर्ण समुदायाचा अविभाज्य भाग होते. त्यांची उणीव आम्हाला कायम भासेल.”
𝗥𝗖𝗕 𝗖𝗮𝗿𝗲𝘀: 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗔𝗻𝗻𝗼𝘂𝗻𝗰𝗲𝗺𝗲𝗻𝘁
Our hearts broke on June 4, 2025.
We lost eleven members of the RCB family. They were part of us. Part of what makes our city, our community & our team unique. Their absence will echo in the memories of each one of… pic.twitter.com/1hALMHZ6os
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) August 30, 2025
बंगळुरात त्यावेळी नेमकं काय घडलं?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्सचा पराभव करत ऐतिहासिक पहिलं विजेतेपद पटकावलं होतं. तब्बल 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आरसीबीने जेतेपद मिळवलं होतं. या अभूतपूर्व विजयानंतर संघाच्या चाहत्यांनी बंगळुरूमध्ये जल्लोष साजरा केला. एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आणि बाहेर प्रचंड गर्दी उसळली. चाहत्यांचा उत्साह अनियंत्रित झाला आणि अचानक चेंगराचेंगरी झाली. यात 11 चाहत्यांचा मृत्यू झाला, तर 33 जण जखमी झाले होते. या घटनेमुळे संघाचा आनंदाचा क्षण काळवंडला आणि कुटुंबियांच्या आयुष्यात कायमची पोकळी निर्माण झाली.






