महिला प्रीमियर लीगचा चौथा हंगाम (WPL 2026) 9 जानेवारी ते 5 फेब्रुवारी या कालावधीत खेळवला जाणार आहे. 5 संघांमध्ये एकूण 22 सामने होणार असून हे सामने नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियम आणि वडोदऱ्यातील बडोदा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम येथे खेळवले जातील.
या सामन्यांची तिकिटे ऑनलाइन उपलब्ध झाली असून तिकिटांच्या किमती फक्त 100 रुपयांपासून सुरू होत आहेत. तिकिटे कुठे आणि कशी बुक करायची, याची संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या.
महिला प्रीमियर लीग 2026 चे वेळापत्रक 29 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आले होते. या स्पर्धेतील पहिला सामना 9 जानेवारीला विद्यमान विजेत्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियम येथे खेळवला जाणार आहे.
यानंतर 10 जानेवारी रोजी डबल हेडर असणार आहे. यामध्ये पहिला सामना यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात होईल, तर दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवला जाईल. स्पर्धेतील सर्व सामन्यांची तिकिटे 100 रुपयांपासून उपलब्ध आहेत.
WPL 2026 सामन्यांची तिकिटे कशी बुक करायची?
ही बातमी लिहेपर्यंत फक्त 100 रुपयांच्या किमतीची तिकिटे ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत. तिकिटे बुक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही महिला प्रीमियर लीगच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा डिस्ट्रिक्ट बाय झोमॅटो (District by Zomato) यांच्या वेबसाइटवर भेट द्या.
तेथे तुम्हाला तिकिटांचा स्वतंत्र सेक्शन दिसेल. त्या सेक्शनवर क्लिक करताच तुमच्यासमोर सर्व सामन्यांची यादी दिसेल, ज्यामधून तुम्ही तुमच्या पसंतीचा सामना निवडून तिकिटे बुक करू शकता.
1 फेब्रुवारीपर्यंत डबल राऊंड रॉबिनचे सामने खेळवले जाणार असून सर्व सामन्यांची 100 रुपयांची तिकिटे ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
9 जानेवारी रोजी होणाऱ्या उद्घाटन सामन्याची जी तिकिटे ऑनलाइन उपलब्ध झाली होती, ती सर्व विकली गेली आहेत. मात्र, लवकरच या सामन्याची तिकिटे पुन्हा उपलब्ध होणार आहेत.
उदाहरणार्थ, तुम्हाला 10 जानेवारी रोजी होणाऱ्या डबल हेडरमधील पहिल्या सामन्याची तिकिटे बुक करायची असतील, तर त्या सामन्याच्या पर्यायावर क्लिक करून तिकिट बुकिंग प्रक्रिया पूर्ण करू शकता.
तिकिट बुक करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे :
- ‘बुक तिकीट’ या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमच्या समोर स्टँड्सचे फोटो दिसतील.
- ज्या स्टँड्सची तिकिटे उपलब्ध आहेत, ते रंगीत (कलरफुल) स्वरूपात दिसतील.
- तुमच्या पसंतीच्या स्टँडवर क्लिक करा.
- पुढे तुम्हाला मोबाईल नंबरद्वारे लॉगिन करावे लागेल.
- तुमच्या मोबाईलवर OTP येईल, तो व्हेरिफाय करा.
- शेवटी ऑनलाइन पेमेंट करा, आणि तुमची तिकिट बुक होईल.
- 2023 – मुंबई इंडियन्स
- 2024 – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू
- 2025 – मुंबई इंडियन्स





