वॉशिंग्टन डीसी – एखाद्याच्या लग्नात बाहेरुन आलेल्यांनीच तिकिटं काडून कार्यालयात प्रवेश केला तर.. तुम्हाला पटणार नाही पण हे वास्तवात घडतंय. लग्न म्हटलं की डोळ्यासमोर येतो सजावट, पाहुणचार, वऱ्हाड्यांचा मानपान, रोषणाई आणि या सगळ्यावर होणारा भरमसाट खर्च.
अनेकांनी तर ट्रेडिंग वेडिंग करायचं म्हणून कर्ज काढल्याचीही अनेक उदाहरणं डोळ्यासमोर आहेत. पण अमेरिकेतल्या एका जोडप्याने चक्क वऱ्हाड्यांनाच खर्च करायला लावला.
लग्नासाठी लावली तिकिटं
अमेरिकन उद्योजक मार्ले जॅक्स आणि स्टीव्ह लार्सन यांना त्यांच्या लग्नाचं नियोजन करताना जास्त खर्च होत असल्याचं लक्षात आलं. मग लग्नासाठी कर्ज घेण्याचाही त्यांनी विचार केला परंतु त्यांना ते करायचं नव्हतं. अशा परिस्थितीत, थेट या जोडप्याने आपल्या लग्नात येणाऱ्यांनी प्रवेशासाठी तिकिटं खरेदी करावीत अशी शक्कल लढवली.
किती रुपयांचं होतं तिकीट?
या जोडप्याने आपल्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवर लिहिलं ‘भेटवस्तू आणू नका, स्वतःचा खर्च करा.’. लग्नाची तिकीटं विकून लाखोंची कमाई केली, लग्नासाठी दोन प्रकारची प्रवेश तिकिटं ठेवली
पहिल्या तिकिटाची किंमत 57 डॉलर्स म्हणजे ५ हजार रुपये होती. 57 डॉलर्सचं तिकीट केवळ लग्नाच्या दिवशीसाठी व्हीआयपी तिकीटाचा दर 997 डॉलर्स म्हणजेच 87 हजार रुपये होती. व्हीआयपी तिकीट लग्नाच्या आधीच्या एक आणि नंतरच्या एक दिवसासाठी एका तिकिटावर फक्त एकाच व्यक्तीला लग्नात प्रवेश होता.
तिकिटांतून दीड लाख डॉलर्स जमा
मार्ले जॅक्स आणि स्टीव्ह लार्सन या जोडप्याने दीड लाख डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम जमा केली आणि उर्वरित रक्कम दानसुद्धा केली. खरतरं आपल्याकडच्या लग्नात भेटवस्तू घेऊन जातात, किंवा आहेर म्हणून पैशाचं पाकिट देतात. पण अमेरिकेच्या या जोडप्याने त्यांचं संपूर्ण लग्नच वऱ्हाडाकडून स्पॉनर करून घेतलं.
भारतात अशी लग्न शक्य आहेत ?
आता हे सगळं ऐकल्यानंतर तुमच्या डोक्यात भारतात असं लग्न शक्य आहे का असे विचार नक्कीच सुरू असतीलच. तिकडे अमेरिकेतल्या वऱ्हाडाने ही तिकीटं खरेदी केली ओ पण आपल्याकडे साडी आणि टॉवेल टोपी आवडली नाही म्हणून रुसून बसणारे वऱ्हाडी या असल्या प्रवेशिका वगेरे खरेदी करण्याच्या शक्यता सध्या तरी दिसत नाही.





