बिजिंग– सायन्स फिक्शनचे सिनेमे आणि पुस्तके प्रचंड लोकप्रिय आहेत. काळाच्या पुढे जात किंवा संशोधनातंर जगात काय वेगळं आणि नवं घडू शकतो याचं सादरीकरण अनेकांना भावतं. टाईम मशिनमध्ये शिरुन जुन्या किंवा नव्या काळात जाणं असो किंवा डायनोसर्सचा हजारो वर्षांपूर्वीचा कालावधी असो, सगळं पडद्यावर पाहताना किंवा पुस्तकात वाटताना अंगावर रोमांच उभे राहतात. आता असचं काहीसं प्रत्यक्षात घडणार आहे. मानवाच्यासेवेसाठी निर्माण करण्यात आलेले रोबो आता मुलांना जन्म घालणार आहेत.
आता रोबो मुलांना जन्म घालणार आहेत. चीनच्या एका तंत्रज्ञान कंपनीनं एका महिलेसारख्या रोबोची निर्मिती केल्याचा दावा केला आहे. या रोबोची क्षमता एका महिलेसारखी गर्भ धारण करण्याची आहे.
कशी होणार रोबोची डिलिव्हरी?
चीनच्या कैवा टेक्नोलॉजीचे संस्थापक आणि सीईओ झांग चीफेंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा रोबो एका कृत्रिम गर्भाशयासह असेल. ज्यात गर्भावस्थेत असलेल्या बिजाचा मूल होण्यापर्यंतचा विकास होऊ शकणारल आहे. याची किंमत साधारणपणे 1 लाख युआन म्हणजे साधारण 14 हजार अमेरिकन डॉलरपेक्षा कमी ठेवली जाणार आहे.
पुढच्या वर्षी हा रोबो बाजारात उपलब्ध होणार आहे.
या कंपनीचे सीईओ झांग यांनी सांगितलंय की, कृत्रिम गर्भाशयाची तांत्रिक पद्धत आता पूर्णपणे तयार झालेली आहे. रोबोच्या पोटात माणूस आणि रोबो यांच्यातील समन्वय आणि भ्रूणाचा विकास होऊ शकतो. ही व्यवस्था इनक्युबेटरपेक्षा वेगळी असते.
कुणाला होणार फायदा?
ही यंत्रणा खास करुन अशा तरुण जोडीदारांसाठी करण्यात आली आहे की, जे तरुण कपल्स लग्न करु इच्छित नाहीत आणि गर्भधारणेपासून लांब राहू इच्छितात. झांग यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसंख्या कमी होण्याच्या समस्येवर हा पर्याय चांगला तोडगा असू शकतो.
कृत्रिम मुलाच्या जन्माचं समर्थन आणि विरोध
झांग यांच्या या प्रकल्पाला अनेक जणांनी समर्थन केलंय. काही जणांनी हा नवा प्रयोग नव्या काळात महिलांना गर्भधारणेपासून लांब राहण्यापासूनचा नवा पर्याय ठरु शकतो. याची किंमतही कमी असून अनेक जणं हा रोबो खरेदी करतील असं सांगण्यात येतंय. तर हे मानवी नैतिकतेच्या विरोधात असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर मुलं न होणाऱ्या महिलांना याचा चांगला आधार मिळणार आहे.





