Rohini Kalam Suicide: भारताची स्टार खेळाडू रोहिणी कलामची आत्महत्या; मध्यप्रदेशातील राहत्या घरी घटना

Written by:Rohit Shinde
Published:
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणारी जू जित्सू खेळाडू रोहिणी कलम हिनं राहत्या घरी आत्महत्या केली. 35 वर्षीय रोहिणी कलम ही तिच्या कुटुंबासह मध्य प्रदेशच्या देवास शहरातील राधागंज येथील अर्जुन नगर इथं राहत होती.
Rohini Kalam Suicide: भारताची स्टार खेळाडू रोहिणी कलामची आत्महत्या; मध्यप्रदेशातील राहत्या घरी घटना

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणारी जू जित्सू खेळाडू रोहिणी कलम हिनं राहत्या घरी आत्महत्या केली. 35 वर्षीय रोहिणी कलम ही तिच्या कुटुंबासह मध्य प्रदेशच्या देवास शहरातील राधागंज येथील अर्जुन नगर इथं राहत होती. विशेष म्हणजे आत्महत्या करण्याच्या फक्त एक दिवस आधी ती घरी परतली होती. पोलिसांना घटनास्थळी कोणतेही पत्र सापडले नाही, त्यामुळं आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

स्टार खेळाडूने जीवनयात्रा संपविली!

खेळाडू रोहिणी कलम एका खाजगी शाळेत मार्शल आर्ट्स प्रशिक्षक म्हणून काम करत होती आणि फक्त एक दिवस आधी देवास इथं घरी परतली होती. कुटुंबातील सदस्यांच्या मते, रविवारी सकाळपर्यंत सर्व काही ठीक होतं. रोहिणीनं कुटुंबातील सदस्यांसह नाश्ता केला. त्यानंतर तिला एक फोन आला. ती तिच्या खोलीत गेली. मात्र यानंतर बराच वेळ ती बाहेर न आल्यानं कुटुंबीय गेट उघडण्यासाठी गेले, परंतु दार बंद होतं. कुटुंबीयांना संशय निर्माण झाला आणि त्यांनी दार उघडलं, परंतु तिनं आत्महत्या केल्याचं आढळलं.

वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

रोहिणीचे वडील महेश कलमने सांगितलं की रोहिणी ज्या शाळेत कोच म्हणून कामाला होती तेथील त्रासाला ती कंटाळली होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या सर्जरीमुळे सुद्धा ती स्ट्रेसमध्ये होती. रोहिणीने 2007 मध्ये आपलं एथलेटिक करिअर सुरु केलं होतं. 18 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिनं  भाग घेतला होता. तिने आठ पदके जिंकली, ज्यात चार रौप्य आणि चार कांस्यपदकांचा समावेश आहे. गेल्या वर्षी, अबू धाबी येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय जुजित्सू स्पर्धेत तिने कांस्यपदक जिंकले. ती जुजित्सू फेडरेशनची सरचिटणीस देखील होती.

कुटुंबाच्या सांगण्यानुसार रोहिणीची आई आणि भाऊ हे खाटू श्यामच्या दर्शनासाठी गेले होते आणि रविवारी संध्याकाळी परतणार होते. घटनेच्या एक दिवस आधी सकाळी तिने आपल्या आईशी फोनवर बातचीत केली होती. जेव्हा रोहिणीचे कोच विजेंद्रने फोन केला तेव्हा कुटुंबाला शंका आली. मात्र तो पर्यंत रोहिणीने टोकाचं पाऊल उचललं होतं. रोहिणीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे आणि तिची खोली सील करण्यात आली आहे. या घटनेने क्रीडा जगत आणि तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

रोहिणी कलामबद्दल थोडक्यात…

रोहिणी कलाम , वय ३५ हे मध्य प्रदेशातील देवास येथील आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू होत्या. त्या भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दिग्गज खेळाडू होत्या आणि आष्टा येथील एका खाजगी शाळेत स्पोर्ट्स कोच म्हणून काम करत होत्या. त्या जुजित्सू फेडरेशनच्या सरचिटणीस होत्या आणि IPS अधिकारी होण्याच्या तयारीत होत्या. मात्र त्यांनी अचानक आपली जीवनयात्रा संपविली!