बंगळुरू चेंगराचेंगरी संदर्भात कर्नाटक सरकारचा अहवाल समोर; आरसीबी व्यवस्थापनावर ठपका, कोहलीचाही उल्लेख!

Written by:Rohit Shinde
Published:
कर्नाटक सरकारने बेंगळूरुमधील चेंगराचेंगरी प्रकरणाचा अहवाल सादर केला आहे. यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु संघाने आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर कोणतीही परवानगी न घेता विजयोत्सव साजरा केल्याचे म्हटले आहे.
बंगळुरू चेंगराचेंगरी संदर्भात कर्नाटक सरकारचा अहवाल समोर; आरसीबी व्यवस्थापनावर ठपका, कोहलीचाही उल्लेख!

कर्नाटक सरकारने बेंगळूरुमधील चेंगराचेंगरी प्रकरणाचा अहवाल सादर केला आहे. यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु (RCB) संघाने आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर कोणतीही परवानगी न घेता विजयोत्सव साजरा केल्याचे म्हटले आहे.  थोडक्यात सरकारने संबंधित चेंगराचेंगरीसाठी बंगळुरू संघ व्यवस्थापन जबाबदार असल्याचे मान्य केले आहे.

बंगळुरू संघ व्यवस्थापनावर ठपका!

सुरुवातीला केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने (CAT) चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियममधील चेंगराचेंगरीसाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुला (RCB) जबाबदार धरले होते. आवश्यक परवानग्यांशिवाय आरसीबीने हा मेळावा आयोजित केल्याचे न्यायाधिकरणाने म्हटले होते. त्यानंतर आता कर्नाटक सरकारने रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु (RCB) संघाला या दुर्घटनेसाठी जबाबदार धरल्याचे समजते आहे. तसा अहवाल समोर आला आहे.

कर्नाटक सरकारने बेंगळूरुमधील चेंगराचेंगरी प्रकरणाचा अहवाल सादर केला आहे. यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु (RCB) संघाने आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर कोणतीही परवानगी न घेता विजयोत्सव साजरा केल्याचे म्हटले आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर हा अहवाल सार्वजनिक करण्यात आला, कारण न्यायालयाने अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज नसल्याचे म्हटले होते. आयपीएल 2025 मध्ये आरसीबीच्या विजयानंतर आयोजित करण्यात आलेल्या विजयोत्सवावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 11 लोकांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते.

प्रकरणात पुढे काय कारवाई होणार?

या अहवालात, सरकारने म्हटले आहे की पोलिसांनी बस मार्गावर सुरक्षा पुरवली होती. या सेलिब्रेशनला तीन लाखांहून अधिक लोकांनी हजेरी लावली होती आणि चिन्नास्वामी स्टेडियमवर दोन रुग्णवाहिका, दोन वैद्यकीय पथके आणि एक अग्निशमन दलाची व्यवस्था करण्यात आली होती, असे अहवालात नमूद आहे. यापूर्वी, केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने (CAT) चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियममधील चेंगराचेंगरीसाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुला (RCB) जबाबदार धरले होते. आवश्यक परवानग्यांशिवाय आरसीबीने हा मेळावा आयोजित केल्याचे न्यायाधिकरणाने म्हटले होते. आपल्या आदेशात न्यायाधिकरणाने वरिष्ठ आयपीएस अधिकारी विकास कुमार विकास यांच्यावरील कर्नाटक सरकारच्या निलंबनाचा आदेशही रद्द केला. त्याना या भीषण चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर कारवाईला सामोरे जावे लागले होते.
न्यायाधिकरणाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, “…प्रथमदर्शनी असे दिसते की सुमारे तीन ते पाच लाख लोक जमले याला आरसीबी जबाबदार आहे. आरसीबीने पोलिसांकडून योग्य परवानगी किंवा संमती घेतली नाही. त्यांनी अचानक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती पोस्ट केली आणि त्या माहितीमुळे लोक जमा झाले.  आता या प्रकरणात पुढे नेमकी काय कारवाई होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews