पंतप्रधान मोदी यांच्या ताफ्यात धावतात या कार, PM ज्या गाडीत बसतात तिचे वैशिष्ट्ये जाणून घ्या

Published:
पंतप्रधान मोदी यांच्या ताफ्यात धावतात या कार, PM ज्या गाडीत बसतात तिचे वैशिष्ट्ये जाणून घ्या

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांपैकी एक आहेत आणि त्यांची सुरक्षा ही देशाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. त्यांच्या ताफ्यातील गाड्या केवळ आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रतीक नाहीत तर त्या जगातील सर्वात सुरक्षित वाहनांपैकी एक मानल्या जातात. चला जाणून घेऊया पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात कोणत्या गाड्यांचा समावेश आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या ताफ्यातील कार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यातील कार या बुलेटप्रूफ, ब्लास्ट-प्रूफ आणि अत्याधुनिक सुरक्षेच्या सुविधांनी सज्ज असतात. या कार पंतप्रधानांचे प्रत्येक संभाव्य धोका टाळण्यासाठी सक्षम असतात. चला, पाहूया त्यांच्या ताफ्यातील प्रमुख कार्स आणि त्यांची वैशिष्ट्यं.

मर्सिडीज-मेबॅक S650 गार्ड

पंतप्रधान मोदी यांच्या ताफ्यातील सर्वात प्रमुख कार म्हणजे मर्सिडीज-मेबॅक S650 गार्ड, जी 2021 मध्ये त्यांच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली. या कारची रचना इतकी भक्कम आहे की ती एखाद्या अभेद्य किल्ल्यासारखी वाटते, जी कोणत्याही शत्रूच्या कटकारस्थानांपासून संरक्षण करू शकते.

या कारची अंदाजित किंमत सुमारे 12 कोटी रुपये आहे. ही कार VR10 स्तराचे संरक्षण प्रदान करते, जे जगातील सर्वात उच्च बुलेटप्रूफ रेटिंग मानले जाते. ही कार AK-47 च्या गोळ्यांपासून, हँड ग्रेनेडसह 15 किलो टीएनटी स्फोटापर्यंत सहन करू शकते.

या कारमध्ये बुलेटप्रूफ काच, ब्लास्ट-प्रूफ चेसिस आणि इन-बिल्ट ऑक्सिजन सप्लाय सिस्टमसारख्या सुविधा आहेत, ज्या तिला एक चालतं-फिरतं अभेद्य किल्ला बनवतात.
पंतप्रधान मोदी यांच्या ताफ्यातील इतर महत्त्वाच्या कार्स

रेंज रोव्हर सेंटिनल

रेंज रोव्हर सेंटिनल ही पंतप्रधान मोदी यांच्या ताफ्यातील आणखी एक अत्यंत महत्त्वाची कार आहे, ज्याची किंमत सुमारे 10 कोटी रुपये आहे. पंतप्रधान मोदी अनेकदा या कारमधून प्रवास करताना दिसतात. ही कार 5.0-लीटर सुपरचार्ज्ड V8 इंजिनसह येते, जे 375 bhp ची शक्ती निर्माण करते.

ही कार विशेषतः स्फोट व गोळीबारापासून संरक्षण करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. एखाद्या हल्ल्यात टायर खराब झाले तरीही ही कार सहजपणे 100 किमीपेक्षा जास्त अंतर पार करू शकते. खराब पाण्याचे मार्ग, चिखल किंवा दगडांनी भरलेले रस्ते ही कार सहज पार करू शकते.

टोयोटा लँड क्रूझर

टोयोटा लँड क्रूझर ही देखील पंतप्रधानांच्या ताफ्याचा भाग आहे, आणि तिची किंमत 2 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. ही कार बुलेटप्रूफ प्लेटिंग आणि काचेने सज्ज आहे. यामध्ये ब्लास्ट प्रोटेक्शन तंत्रज्ञानही आहे. तिची ऑफ-रोड क्षमता आणि मजबूत रचना यामुळे ती व्हीआयपी मूव्हमेंटसाठी आदर्श मानली जाते.

बीएमडब्ल्यू 7 सिरीज

ही उच्च सुरक्षा युक्त कार बऱ्याच काळापासून पंतप्रधानांच्या ताफ्याचा भाग आहे. या कारमध्ये विशेष सेन्सर्स आहेत, जे सुमारे 500 मीटर अंतरावर असलेला स्फोटक पदार्थ किंवा क्षेपणास्त्र आधीच ओळखू शकतात.

ही कार AK-47 आणि हँड ग्रेनेडच्या हल्ल्यांपासून संरक्षण देते. तसेच, यामध्ये पंक्चर-प्रूफ टायर्स आणि इमर्जन्सी ऑक्सिजन टँकसारखी वैशिष्ट्येही आहेत.