Rinku Singh Engagement: रिंकू सिंहने अंगठी घालताच भावुक झाल्या प्रिया सरोज, आनंदाश्रू थांबवू शकल्या नाहीत

Written by:Smita Gangurde
Published:
Last Updated:
रिंकू सिंग आणि प्रिया सरोज यांच्या साखरपुड्यासाठी प्रियाने रिंकूसाठी कोलकाता येथून एक डिझायनर अंगठी खरेदी केली, तर रिंकूने प्रियासाठी मुंबईहून एक खास अंगठीही मागवली. दोन्ही अंगठ्यांची किंमत अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे.
Rinku Singh Engagement: रिंकू सिंहने अंगठी घालताच भावुक झाल्या प्रिया सरोज, आनंदाश्रू थांबवू शकल्या नाहीत

भारतीय क्रिकेट टीममधून दोन दिवसीय आणि ३३ टी-२० सामन्यात जबरदस्त कामगिरी केलेला वंडर बॉय रिंकु सिंह याचा आज ८ जून रोजी समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोजसोबत साखरपुडा पार पडला.

क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांच्या साखरपुड्याचा सोहळा हॉटेल सेंट्रममध्ये पार पडला. नातेवाईक आणि निवडक मित्र-आप्तेष्टांच्या उपस्थितीत रिंकू आणि प्रिया यांनी एकमेकांना लग्नाचं वचन दिलं. पांढऱ्या रंगाच्या शेरवानीमध्ये रिंकू सिंह उठून दिसत होता. याशिवाय प्रिया सरोज यांनी हलक्या गुलाबी रंगाचा लहेंगा घातला होता.

प्रिया सरोज भावुक झाल्या…

दोघांनी एकत्रितपणे एकमेकांचा हात पकडून मंडपात प्रवेश केला. रिंकू सिंहने प्रिया यांचा हात पकडून त्यांना स्टेजवर चढायला मदत केली. स्टेजवर आल्यानंतर त्यांचं फोटो काढले जात होते. काही वेळाने रिंकू सिंहने प्रिया सरोन यांना अंगठी घातली. रिंकूने प्रियाचा हात हातात घेतला आणि उंचावला. दोघेही खूप आनंदी दिसत होते. यादरम्यान प्रियाच्या डोळ्यात आनंदाश्रू झळकले.

अन् रिंकूचं आयुष्य बदललं…

लखनऊच्या पंचतारांकित हॉटेल सेंट्रममध्ये दोघांचा साखरपुडा पार पडला. आयपीएल २०२३ मध्ये, ९ एप्रिल रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर, कोलकाता नाईट रायडर्सचा रिंकू सिंग गुजरात टायटन्सच्या यश दयालच्या एका ओव्हरमध्ये सलग पाच षटकार मारून सुपरस्टार बनला. त्या खेळीनंतर त्याचे आयुष्य इतके बदलले की त्याला क्रिकेट जगतात एक वेगळी ओळख मिळाली.