मुंबई- एशिया कप 2025च्या तारखा क्रिकेटप्रेमींसाठी जाहीर झाल्या आहेत. 9 सप्टेंबरला ही टुर्नामेंट सुरु होणार असून 28 सप्टेंबरपर्यंत या मॅचेस चालणार आहेत. या सगळ्या मॅच दुबईत खेळवण्यात येणार आहेत.

भारत आणि पाकिस्तान कोणत्या ग्रुपमध्ये आहेत याकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष होतं. या दोन्ही टीम एकाच ग्रुपमध्ये खेळणार आहे. दोन्ही देशांच्या टीममध्ये पहिली मॅच 14 सप्टेंबरला होईल. जर दोन्ही टीम स्टेज 4 पर्यंत पोहचल्या तर 21 सप्टेंबरला दुसऱ्यांदा दोन्ही टीम आमनेसामने येण्याची शक्यता आहे.

टी-20 एशिया कपची उत्सुकता

एशियन क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी याबाबत माहिती दिली आहे. नक्वी हे पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षही आहेत. त्यांनी एक्सवर लिहिलं आहे की, एशिया कपच्या मॅचेच 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान दुबईत होणार आहे. ही एक शानदार चुर्नामेंट असेल आणि सगळ्यांना चांगलं क्रिकेट या मॅचेसमध्ये पाहता येईल.

भारताची पहिली मॅच दुबईशी

भारत, पाकिस्तान, दुबई आणि ओमान हे चारही संघ एकाच ग्रुपमध्ये असणार आहेत. श्रीवंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आमि हाँगकाँग या चार टीम दुसऱ्या बी ग्रुपमध्ये असतील. ग्रुपमध्ये प्रत्येक टीम दुसऱ्या टीमशी एकेक मॅच खेळणार आहे. टीम इंडियाची पहिली मॅच 10 सप्टेंबरला दुबईशी, 14 सप्टेंबरला पाकिस्तानशी आणि 19 सप्टेंबरला ओमानशी होणार आहे.

तीन वेळा आमनेसामने येण्याची संधी

भारत आणि पाकिस्तानच्या टीमनं सुपर 4 मध्ये जागा मिळवली तर दुसऱ्यांगा 21 सप्टेंबरला दोन्ही टीम आमनेसामने येतील. या टुर्नामेंटची फायनल 28 सप्टेंबरला खेळवली जाणार आहे. दोन्ही टीमनं चांगला परफॉर्मन्स दिला तर तिसऱ्यांदा दोन्ही टीम आमनेसामने येण्याचीही शक्यता नाकारता येणारी नाही.

गेल्या वेळी एशिया कप पाकिस्तानात

एशिया कप 2023 चं यजमानपद पाकिस्तानकडे होतं. भारतीय टीम सुरक्षेच्या कारणामुळे पाकिस्तानात जाऊ शकली नव्हती. त्यावेळी टीम इंडियाच्या मॅचेस या श्रीलंकेत खेळवण्यात आल्या होत्या. भारतानं श्रीलंकेचा पराभव करत 2023 साली एशिया कप जिंकला होता.

पहलगाम हल्ल्यानंतर टीम इंडिया खेळणार का?

एप्रिलमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे. त्यानंतर ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानात दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत. या परिस्थितीमुळे एशिया कपसाठी पाकिस्तानी टीम भारतात येणं जवळपास अशक्य होतं. त्यामुळं एशिया कप टुर्नामेंट दुबईत खेळवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

भारतानं 8 वेळा एशिया कप जिंकलाय

एशिया कपची सुरुवात 1984 साली झाली होती. आत्तापर्यंत 16 वेळा ही टुर्नामेंट घेण्यात आली आहे. यात सर्वाधिक 8 वेळा एशिया कप भारतानं जिंकला आहे. तर श्रीलंकेनं 6 वेळा तर पाकिस्ताननं 2 वेळा एशिया कप जिंकलाय.