IPL 2025: आयपीएलमध्ये आज केकेआर आणि किंग्स इलेव्हन आमनेसामने, कोण जिंकणार?

Written by:Rohit Shinde
Published:
आयपीएलमध्ये आज किंग्स इलेव्हन पंजाब आणि कोलकाता क्नाईट रायडर्स हे संघ आमनेसामने असणार आहे. दोन्ही संघांमध्ये तुल्यबळ लढत पाहायला मिळू शकते.
IPL 2025: आयपीएलमध्ये आज केकेआर आणि किंग्स इलेव्हन आमनेसामने, कोण जिंकणार?

चंदीगढ: आयपीएल 2025 च्या हंगामातील 31 वा सामना आज किंग्स इलेव्हन पंजाब आणि कोलकाता क्नाईट रायडर्स या दोन संघांमध्ये खेळला जात आहे. चंदीगढमधील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडीयमवर आज 7.30 वाजता हा सामना सुरू होईल. दोन्ही संघ हा सामना जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरतील, कारण दोन्ही संघांना आयपीएलमधील आव्हान काय ठेवायचं असेल तर आजचा हा सामना जिंकणं गरजेचं आहे.

कुणाचं पारडं जड, कोण जिंकेल?

आयपीएल 2025 च्या हंगामाचा विचार केला असता, पंजाबच्या संघाने आजवर 5 सामने खेळले आहेत, पैकी 3 सामन्यांमध्ये संघाला विजय प्राप्त करता आलाय, 6 गुणांसह संघ गुणतालिकेत सध्या सहाव्या स्थानावर आहे. तुलनेत कोलकात्याची स्थिती काहीशी बरी आहे. कोलकाता क्नाईट रायडर्सने आजवर 5 सामने खेळले असून पैकी 3 सामने जिंकत पाचवे स्थान मिळवले आहे. संघाचा नेट रन रेट चांगला आहे.

आजवरचा आयपीएल इतिहास पाहिला असता, दोन्ही संघांतील शेवटच्या 33 सामन्यांचा विचार केला असता यातील कोलकाता क्नाईट रायडर्स संघाने 21 तर पंजाबच्या संघाला अवघे 12 सामने जिंकता आले आहेत. आकड्यांमध्ये कोलकाता क्नाईट रायडर्स संघांच्या बाजूने झुकत माप दिसत असलं तरी जाणकार आणि क्रिकेट रसिकांच्या मते आजच्या सामना किंग्स इलेव्हन पंजाब संघाचं पारडं अधिक जड असल्याचं मानलं जात आहे. त्यामुळे पंजाबचा संघ आजचा सामना जिंकेल, अशी शक्यता अधिक वर्तवली जात आहे.

दोन्ही संघाचे ‘प्लेयिंग इलेव्हन’

कॅप्टन श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पंजाब चांगली कामगिरी करत आहेत. संघांची फलंदाजी नेहाल वढेरा, श्रेयस अय्यर, ग्लेन मॅक्सवेल चांगल्या प्रकारे सांभाळताना दिसत आहेत. तर गोलंदाजीची जबाबदारी अर्शदीप सिंग, लॉकी फर्ग्सुसन, युझवेंद्र चहल, कुलदीप सेन यांच्यावर प्रामुख्याने असणार आहे. होम ग्राऊंडवर मॅच असल्याचं काही प्रमाणात फायदा पंजाबच्या संघाला मिळण्याची शक्यता आहे,

दुसरीकडे कोलकात्याच्या संघामध्ये कॅप्टन अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, रिंकू सिंग, आंद्रे रसेल यांच्यावर फलंदाजीची कमान असेल. सुनील नरीने, हर्षीत राणा, एनरीच नॉर्टीजे यांना गोलंदाजीच्या जोरावर संघाचा विजयाचा मार्ग सुकर करावा लागणार आहे,

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews