IPL 2025 CSK KKR: आयपीएलमध्ये आज सीएसके आणि केकेआर आमनेसामने, कोण जिंकणार?

Written by:Rohit Shinde
Published:
वा सामना आज चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्याबाबत सविस्तर जाणून घ्या...
IPL 2025 CSK KKR: आयपीएलमध्ये आज सीएसके आणि केकेआर आमनेसामने, कोण जिंकणार?

चेन्नई: आयपीएल 2025 च्या सीझनमध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना रंगणार आहे. या दोन्ही संघांनी एकूण 8 आयपीएल जेतेपदे जिंकली आहेत, त्यामुळे दोन्ही संघ पूर्ण ताकदीने कमबॅक करण्याच्या विचारात आहेत. दुसरीकडे कोपराच्या दुखापतीमुळे ऋतुराज गायकवाड स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महेंद्र सिंग धोनीच्या हाती संघाच्या नेतृत्वाची सुत्रं गेली आहेत. हा आयपीएल 2025 चा 25 वा सामना असेल, जो चेपॉक स्टेडियमवर खेळला जाईल.

कोणता संघ जिंकेल?

चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आतापर्यंत एकूण 30 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी सीएसकेने  19 वेळा आणि 
कोलकाता फक्त 10 वेळा जिंकली आहे. त्याच वेळी, त्याचा एक सामना रद्द घोषित करण्यात आला होता.कोलकाता आणि चेन्नई यांच्यात 
खेळल्या गेलेल्या शेवटच्या 10 सामन्यांमध्ये, सीएसकेने वर्चस्व गाजवले आहे.कारण त्यांनी 7 वेळा केकेआरला हरवले आहे. एकंदरीतच आजच्या 
सामन्यामध्ये सीएसके संघाचे पारडे जत दिसत आहे. त्याच वेळी, गायकवाड बाहेर पडल्याने केकेआरला मानसिक बळकटी देखील मिळेल. 
जर केकेआरने त्यांच्या योजनेनुसार खेळ केला तर ते आज चेन्नईला हरवू शकतात.

हे खेळाडू महत्वाचे:

रचिन रवींद्र, डेवोन कॉनवे, राहुल त्रिपाठी, विजय शंकर, रवींद्र जड़ेजा, एमएस धोनी (कॅप्टन), रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, मुकेश चौधरी, खलील अहमद, मथीशा पथिराना या खेळाडूंवर प्रामुख्याने सीएसकेच्या संघाची जबाबदारी असणार आहे. तर दुसरीकडे क्विंटन डी कॉक, सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कॅप्टन), वेंकटेश अय्यर, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, रमनदीप सिंह, हर्षित राणा, स्पेन्सर जॉनसन, वैभव अरोड़ा, वरुण चक्रवर्ती हे खेळाडू कोलकात्याच्या दृष्टीने महत्वाचे असणार आहेत.

सीएसकेचं आव्हान यंदाच्या आयपीएल हंगामात अडचणीत आले आहे. खेळलेल्या 5 सामन्यांपैकी अवघा एक सामना जिंकत संघ 9 व्या स्थानावर आहे. तर दुसरीकडे तर केकेआरने 5 पैकी 2 सामने जिंकले आहेत, संघ सध्या सहाव्या स्थानावर आहे, या सीझनमधील आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी केकेआरला आज विजय महत्वाचा आहे.