IPL 2025 | आयपीएलमध्ये आज आरसीबी – दिल्ली कॅपिटल्स भिडणार!

Written by:Rohit Shinde
Published:
आयपीएल 2025 च्या हंगामातील आज एक महत्वाचा सामना खेळला जाणार आहेय रॉयल चॅलेजर्स बंगळूरू आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन संघ आमने सामने असणार आहेत.
IPL 2025 | आयपीएलमध्ये आज आरसीबी – दिल्ली कॅपिटल्स भिडणार!

बंगळुरू: आयपीएल 2025 च्या मोसमातील 24 वा सामना आज खेळला जात आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांमध्ये हा खेळला जाईल. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आज संध्याकाळी 8.00 वाजता ही मॅच सुरू होईल. खरंतर आतापर्यंत दोन्ही संघांसाठी हा आयपीएल सिझन शानदार राहिला आहे. दोन्ही संघ सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. दिल्ली कॅपिटल्सने आजवर 3 सामने खेळले असून पैकी सर्व जिंकून पाईंट टेबलमध्ये दुसरे स्थान मिळवले आहे.

बंगळुरूचा संघ चांगल्या स्थितीत

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने आयपीएल 2025 च्या हंगामात आजवर 4 सामने खेळले असून पैकी तीन सामन्यांमध्ये मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. तर अवघ्या एका सामन्यात निसटता पराभव स्विकारावा लागला. 6 गुणांसह संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. गुजरात टायटन्स विरूद्धचा अवघा एक सामना संघाने गमावला. संघातील खेळाडूंची सातत्यपूर्ण कामगिरी पाहता आज बंगळुरूचं पारडं जड मानलं जात आहे.

कुणाचं पारडं जड?

2025 चा आयपीएल हंगाम रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघासाठी आतापर्यंत चांगला राहिला आहे. रजत पाटीदार उत्तम कॅप्टन म्हणून कामगिरी बजावतोय. तर संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली देखील चांगलाच फॉर्मात आहे. संघातील सर्व गोलंदाजांचीही उत्तम साथ मिळताना दिसत आहे.  बंगळूरूचा संघ सध्या चांगल्या लयीत पाहायला मिळत आहे. कर्णसाधार रजत पाटीदार, विराट कोहली, देवदत्त पडीकल, टीम डेविड यांची जबाबदारी फलंदाजीत मोठी असणार आहे. दुसरीकडे आरसीबीचे गोलंदाज जॉस हेजलवूड, भुवनेश्वर कुमार, फिव सॉल्ट यांची गोलंदाजीतील भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे, सामना बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होत असल्याने याचा फायदा नक्कीच या संघाला होणार आहे.

दिल्ली कॅपिटल्स संघाच्या बाबतीत विचार करायचा झाल्यास  कर्णधार अक्षर पटेलच्या नेतृत्वात दिल्लीचा संघ यंदा फॉर्मात आहे. फाफ डू प्लेसिस, करूण नायर, आशुतोष शर्मा, समीर रिझवी यांच्यावर फलंदाजीची जबाबदारी असणार आहे. तर टी नटराजन, मिशेल स्टार्क, अक्षर पटेल, मोहित शर्मा, कुलदीप यादव असे तगडे गोलंदाज या संघाकडे आहेत. याचा फायदा निश्चितच दिल्लीच्या संघाला मिळणार आहे.

एकंदरीत काय तर आजचा होणारा हा सामना अटीतटीचा होण्याची शक्यता अधिक आहे. आजचा सामना जिंकत प्ले ऑफसाठीची वाटचाल अधिक सुकर करण्याचा दोन्ही संघाचा मानस असणार आहे. विश्लेषकांचा मते आरसीबी आजचा हा सामना जिंकण्याची अधिक शक्यता आहे.

 

 

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews