IPL 2025 RCB PBKS: आयपीएलमध्ये आज रॉयल चॅलेंजर्स विरूद्ध पंजाबचा सामना, कुणाचं पारडं जड?

Written by:Rohit Shinde
Published:
आयपीएलमध्ये आज पंजाब आणि बंगळुरूच्या संघांचा सामना होणार आहे, नेमकं यामध्ये कुणाचं पारडं जड आहे, कोण जिंकेल ते जाणून घेऊयात...
IPL 2025 RCB PBKS: आयपीएलमध्ये आज रॉयल चॅलेंजर्स विरूद्ध पंजाबचा सामना, कुणाचं पारडं जड?

बंगळुरू: आयपीएल 2025 च्या हंगामातील 34 वा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स या संघांमध्ये होणार आहे. बंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आज रात्री 7.30 वाजता हा सामना सुरू होईल. पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स या दोन्ही संघांसाठी हा सामना आयपीएलमधील आपलं आव्हान कायम ठेवण्यासाठी महत्वाचा असणार आहे. तर बंगळुरूमधील प्ले ऑफ्सच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी या सामन्यात विजय गरजेचा असणार आहे.

बंगळूरू vs पंजाब, कोण कुणावर भारी?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने या सीझनमध्ये खेळलेल्या 6 पैकी 4 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. संघाकडे 8 गुण असून गुणतालिकेत संघ सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. प्ले ऑफ्समध्ये आणखी आघाडी घ्यायची असेल तर आणखी वरचा क्रमांक गाठण्याचा प्रयत्न बंगळुरूच्या संघाचा असणार आहे. रॉयल चॅलेंजर्स यंदा चांगल्या लयीत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे या सीझनमध्ये खेळलेल्या 6 पैकी 4 सामन्यांमध्ये विजय मिळवत पंजाबच्या संघाला देखील 8 गुण मिळालेले आहेत, संघ पॉईंट्स टेबलमध्ये 4 थ्या स्थानावर आहे. सरासरी रन रेटच्या बाबतीत बंगळुरू पंजाबच्या पुढे असल्याचे चित्र आहे.

आजवरच्या आयपीएल इतिहासाच्या दृष्टीने दोन्ही संघांचा विचार केला असता लक्षात येते की शेवटच्या 33 सामन्यांमध्ये पंजाबने 17 सामने तर बंगळुरूच्या संघाने 16 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तरीही जाणकारांच्या मते आजच्या सामन्यात बंगळुरूचं पारडं जड मानलं जात आहे. त्यामुळे बंगळुरूचा संघ या सामन्यात विजय मिळवतो का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दोन्ही संघाचे प्लेयिंग इलेव्हन:

बंगळुरूचा कॅप्टन रजत पाटीदार सध्या चांगलं नेतृत्व करत आहे. तर फलंदाजीमध्ये विराट कोहली, देवदत्त पडीकल, टीम डेव्डिड, चिकारा यांच्याकडून चांगल्या अपेक्षा आहेत, कोहली चांगल्या लयीत आहे. तर गोलंदाजीची धुरा कृणाल पांड्या, फिल सॉल्ट, भुवनेश्वर कुमार यांच्यावर असणार आहे.

पंजाबच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये नेहला वढेरा, कॅप्टन श्रेयस अय्यर, ग्लेन मॅक्सवेल यांच्यासारखे स्टार फलंदाज आहेत. तर लॉकी फर्ग्युसन, युझवेंद्र चहल यांच्यासारखे गोलंदाज देखील पंजाबच्या संघाकडे आहेत.

 

 

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews