IPL 2025 : आज आयपीएलचे दोन सामने, कोण कुणावर भारी ?

Written by:Rohit Shinde
Published:
आयपीएल 2025 च्या हंगामातील 26 आणि 27 वा सामना आज खेळला जात आहे. यामध्ये गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स नंतर पंजाब किंग्स विरूद्ध सनरायजर्स हैदराबाद असे सामने असतील.
IPL 2025 : आज आयपीएलचे दोन सामने, कोण कुणावर भारी ?

नवी दिल्ली: आयपीएल 2025 चा हंगाम आता रंगतदार वळणावर आला आहे. आज या सीझनमधील 26 आणि 27 वा सामना खेळला जात आहे. सुरूवातीला गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स असा सामना होईल. लखनऊतील एकना स्टेडीयमवर हा सामना आज संध्याकाळी 4.00 वाजता सुरू होईल. तर दुसरा सामना किंग्स इलेव्हन पंजाब आणि सनरायजर्स हैदराबाद या संघांत खेळला जात आहे. आज रात्री 8.00 वाजता हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडीयमवर हा सामना पार पडेल.

LSG VS GT कोण जिंकेल?

लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांचा विचार केला असला गुजरात हा सामना जिंकण्याची अधिक शक्यता असल्याचं बोललं जात आहे. गुजरात आजवर खेळलेल्या 5 पैकी 4 सामन्यांत विजय मिळवत अव्वल स्थानावर आहे. तर दुसरीकडे लखनऊ सुपर जायंट्स 5 पैकी 3 सामने जिंकत 6 व्या स्थानावर आहे. दोन्ही संघाचा विचार केला असता मागील 5 सामन्यांत दोन्ही संघ आमनेसामने आले असता गुजरातने 4 सामने जिंकले आहेत.

दोन्ही संघांच्या दृष्टीने गुजरात कॅप्टन शुभमन गिल, फलंदाज साई सुदर्शन , रूदरफोर्ड , बटलर गोलंदाजीत अर्शद खान, ईशांत शर्मा यांच्यावर संघाची भिस्त असणार आहे. तर दुसरीकडे लखनऊच्या दृष्टीने एडन मार्करम, डेविड मिलर, मिशेल मार्श, रिषभ पंत, आवेश खान, रवी बिष्णाेई यांच्यावर मदार असेल.

PBKS VS SRH कोण जिंकेल?

हैदराबाद संघाच्या दृष्टीने आयपीएल 2025 चा सीझन तितकासा असा फायदेशीर राहिलेला नाही, असं असलं तरी दोन्ही संघांमधील आजचा सामना अटीतटीचा होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. आजवर खेळलेले 5 पैकी अवघा 1 सामना जिंकता आल्याने हैदराबादच्या संघ गुणतालिकेत 10 व्या स्थानवर आहे, आज सामना हरल्यास हैदराबादचं यंदाच्या मोसमातील आव्हान संपुष्टात येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पंजाबचा संघ चांगल्या लयीत दिसत आहे. दोन्ही संघांतील शेवटच्या 23 सामन्यांपैकी हैदराबादने 16 तर पंजाबने 7 सामने जिंकलेत.

पंजाबच्या दृष्टीने कॅप्टन श्रेयस अय्यर, नेहल वढेरा, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोईनिस यांची भूमिका महत्वाची असणार आहे. तर दुसरीकडे हैदराबादचा कॅप्टन कमिन्सच्या कौशल्याचा कस लागणार आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews