IPL DC VS RCB: दिल्ली कॅपिटल्सचा झंझावात कायम, बंगळुरूच्या संघाला हरवलं!

Written by:Rohit Shinde
Published:
Last Updated:
बंगळुरूमधून दिल्ली आणि बंगळुरूच्या संघांमधील सामन्याचा निकाल समोर आला आहे.
IPL DC VS RCB: दिल्ली कॅपिटल्सचा झंझावात कायम, बंगळुरूच्या संघाला हरवलं!

बंगळुरू: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स या संघात आज बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर सामना पार पडला. यामध्ये विजय मिळवत दिल्लीच्या संघाने प्ले ऑफच्या दिशेने महत्वाचं पाऊल टाकलं आहे. 6 विकेट्स राखून दिल्लीने हा विजय मिळवला.

दिल्ली कॅपिटल्सचा मोठा विजय

दिल्लीच्या संघाच्या दृष्टीने हा विजय अत्यंत महत्वाचा होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने दिलेले 164 धावांचे आव्हान के.एल राहुल नाबाद 93 तर स्टब्स नाबाद 38 यांच्या फलंदाजीच्या जोरावर अगदी सहज गाठले. आरसीबीला मात्र पराभवाला सामोर जावं लागलं.

सुरुवातीला टॉस जिंकत दिल्लीच्या संघाने गोलंदाजी करण्याचा  निर्णय घेतला. हा निर्णय काही प्रमाणात दिल्लीच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला कारण, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाला अवघ्या 163 धावांवर रोखण्यात त्यांना यश आलं, बंगळुरूच्या फिल सॉल्टने 37 तर टीम डेविडने नाबाद 37 धावा केल्या. इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. कुलदीप यादव , विपराज निगमने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

164 चे टार्गेट गाठताना दिल्लीचे सुरूवातीचे फलंदाज ढेपाळले, पण पुढे के. एल राहुलच्या नाबाद 93 धावांच्या जोरावर दिल्लीने विजयरथ खेचून आणला.

 

प्ले ऑफ्स दृष्टीपथात

दिल्लीने आजवर खेळलेले 4 पैकी 4 सामने जिंकून आठ गुण मिळवलेत. त्यामुळे गुणतालिकेत संघ दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.