लंडन – इंग्लडविरुद्धच्या पाच टेस्टच्या मालिकेत दुसऱ्या टेस्टच्या विजयानंतर तिसऱ्या टेस्टमध्ये क्रिकेट रसिकांच्या पदरी निराशा आली. मॅचच्या अखेरच्या दिवशी टीम इंडिया 6 विकेट्स हाताशी असतानाही 135 धावांचा टप्पा पार करु शकली नाही. टीम इंडियाचे सगळे बॅट्समन 112 धावात ऑलआऊट झाले.
या विजयामुळे इंग्लंडच्या टीमनं अंडरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या सीरिजमध्ये 2-1 ने आघाडी घेतली आहे. या मॅचमध्ये इंग्लंडचा केवळ 22 रन्सनी विजय झालाय.
कशी झाली टेस्ट मॅच?
गुरुवारी 10 जुलैला ही तिसरी टेस्ट मॅच सुरु झाली होती. इंग्लंडच्या टीमनं बँटिंगचा निर्णय घेतला होता. पहिल्या इनिंगमध्ये टोन्ही टीम्सना 387-387 रन्सचा टप्पा गाठता आला. दुसऱ्या इनिंगमध्ये इंग्लंडच्या टीमनं 192 रन्स केले होते. 193 रन्सचं टार्गेट गाठताना टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक झाली.
के एल राहुल आणि रवींद्र जडेजा वगळता एकाही बॅट्समनला 15 रन्सचा टप्पाही पार करता आला नाही. इंग्लंडच्या बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट्स घेतल्या.
टीम इंडियाचे बॅट्समन अपयशी
पहिल्या आणि दुसऱ्या टेस्टमध्ये उत्तम कामगिरी केलेल्या शुभमन गिलला तिसऱ्या टेस्टमध्ये सूर गवसला नाही. यशस्वी जयस्वालही चांगली कामगिरी करु शकला नाही. या दोघांनी मिळून या टेस्टमध्ये केवळ 39 रन्स केले. या दोघांच्या खराब कामगिरीमुळे ऋषभ पंत, के एल राहुल आणि रवींद्र जडेजा यांच्याकडून टीमला अपेक्षा होत्या. या तिघांची कामगिरी चांगली झाली असली तरी इतर बॅट्समनची हवी तशी साथ त्यांना मिळू शकली नाही.
पराभवाची इतर कारणं
तिसऱ्या टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये लोअर ऑर्डर बॅट्समनची कामगिरी अत्यंत सुमार राहिली. पहिल्या इनिंगमध्ये 11 रन्स मिळवताना चार क्रिकेटर पॅव्हेलियनमध्ये परतले. तर दुसऱ्या इनिंगमध्ये राहुल आणि जडेजा सोडल्यास कुणीही 15 रन्सचा टप्पाही पार केला नाही.
लॉर्ड्स ग्राऊंडवरं पिच टेस्टच्या अखेरच्या टप्प्यात टीम इंडियाच्या बॅट्समनसमोर डोकेदुखी ठरलं. ग्राऊंडवर बाऊन्स आणि स्विंगचं प्रमाण जास्त असल्यानं बॅट्समन गडबडल्याचं पाहायला मिळालं. बॅटिंगसाठी ग्राऊंड अवघड झाल्याचं अखेरच्या दोन दिवसांत प्रकर्षानं जाणवलं.





