उलट्या पडलेल्या चपलांमुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि विनाकारण वाद-भांडणे होतात. कुटुंबातील सदस्यांमध्ये अनावश्यक भांडणं आणि वाद होतात. घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि सकारात्मकता कमी होते.
शनिदेवाचा प्रकोप
शनिदेवाला पायांचा कारक मानले जाते. त्यामुळे उलटे बूट-चपला ठेवल्यास शनिदेव रुष्ट होतात आणि त्याचा परिणाम आरोग्य, सुख-शांती व संपत्तीवर होतो. जर तुमच्या चपला उलट्या सुलट्या घराच्या दारात पडल्या असतील तर त्यामुळे शनिदेव रागावतात. त्यांच्या प्रकोपाला तुम्हाला सामोरे जावे लागते.
वास्तुदोष
अस्ताव्यस्त किंवा उलटे पडलेले बूट-चपलांमुळे वास्तुदोष निर्माण होतो, ज्यामुळे घरात अशांती पसरते.
आर्थिक आणि आरोग्य समस्या
वास्तुशास्त्रानुसार उलटं पडलेलं चप्पल घरात नकारात्मक ऊर्जा आणतं, ज्यामुळे कुटुंबात अशांती, आर्थिक नुकसान आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. घरात आजारपण येऊ शकते, अशीही एक धारणा आहे.
काय करावे?
- घराच्या दारात किंवा आतमध्ये चपला नेहमी सरळ ठेवाव्यात.
- शक्यतो प्रवेशद्वाराजवळ शूज रॅक ठेवू नये, पण ठेवल्यास चपलांची योग्य दिशा आणि व्यवस्था असावी.
- उलट्या पडलेल्या चपला लगेच सरळ कराव्यात, कारण त्या तशाच राहिल्यास घरातल्या समस्या वाढतात.
- चपला ठेवण्यासाठी पश्चिम दिशा किंवा नैऋत्य व वायव्य दिशा उत्तम मानल्या जातात; पूजाघर किंवा स्वयंपाकघराजवळ ठेवू नयेत.
- तुटलेल्या किंवा खराब झालेल्या चपला घरातून काढून टाकाव्यात, कारण त्या नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात.
- दारात चपलांची योग्य मांडणी करणे हे घरात सुख-समृद्धी आणि सकारात्मक वातावरण राखण्यासाठी महत्त्वाचे मानले जाते.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)





