Remedies to keep eyes cool: अलीकडे सर्वत्र प्रचंड प्रदूषण झाले आहे. याचा लोकांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत आहे. अनेकांना डोळ्यांची जळजळ होण्याची समस्या देखील आहे. यामुळे डोळ्यांच्या अॅलर्जी, डोळे कोरडे होणे, सूज येणे आणि खाज येणे यासारख्या समस्या वाढल्या आहेत. जर तुम्ही या दैनंदिन समस्येवर घरगुती उपाय शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
आज आम्ही डोळ्यांची जळजळ कमी करण्यासाठी आणि डोळ्यांच्या स्नायूंचा ताण कमी करण्यासाठी काही सोप्या आणि घरगुती उपयांबाबत माहिती देत आहोत. डोळ्यांची जळजळ कमी करण्यासाठी घरगुती उपायांबद्दल जाणून घेऊया…..
थंड पाण्याने डोळे स्वच्छ करा-
डोळ्यांची जळजळ आणि आग कमी करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे, दिवसातून अनेक वेळा थंड पाण्याने डोळे धुणे. यामुळे जळजळ कमी होईल आणि आराम मिळेल. तुम्ही थंड पाण्यात स्वच्छ कापड बुडवून डोळ्यांवर ठेवू शकता. त्यामुळेसुद्धा आराम मिळेल.
काकडी-
काकडीचा गुणधर्म अतिशय थंड असतो. डोळ्यांची जळजळ कमी करण्यासाठी, रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेल्या काकडीचे गोल तुकडे करा आणि झोपण्यापूर्वी ते तुमच्या डोळ्यांवर १० मिनिटे ठेवा. तुम्ही त्याचा रस काढू शकता आणि त्यात बुडवलेल्या कापसाचे पॅडदेखील वापरू शकता.
गुलाबजल-
गुलाबजलमध्ये अँटी इन्फ्लीमेंट्री गुणधर्म असतात. डोळ्यांना गुलाबजल लावल्याने जळजळ आणि सूज कमी होते. जेव्हा जेव्हा तुमच्या डोळ्यांना जळजळ होते तेव्हा कापसाचा किंवा कापडाचा एक छोटा तुकडा घ्या, तो गुलाब पाण्यात बुडवा आणि डोळ्यांवर ठेवा. यामुळे आराम मिळेल.
टी-बॅग्स फायदेशीर-
ग्रीन टी किंवा कॅमोमाइल टी बॅग्ज रेफ्रिजरेटरमध्ये थंड करा आणि त्या तुमच्या डोळ्यांवर १०-१५ मिनिटे ठेवा. या टी बॅग्जमधील अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी इन्फ्लीमेंट्री गुणधर्म डोळ्यांची जळजळ कमी करण्यास मदत करतात.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





