Tue, Dec 30, 2025

Amit Shah Kundali 2026 : भाजपचे चाणक्य अमित शाह यांना कसं जाईल 2026? कुंडलीच सगळं सांगतेय

Published:
अमित शहांची कुंडली कन्या लग्नाची आहे आणि ज्योतिषांच्या मते, बुध आणि केतूची शक्तिशाली युती त्यांच्या यशाचे खरे गमक आहे. कन्या लग्नातील बुधाची शक्तीच त्यांना रणनीती आखण्याची शक्ती देते, अशी शक्ती जी सर्वात प्रमुख व्यक्तींनाही आश्चर्यचकित करते
Amit Shah Kundali 2026 : भाजपचे चाणक्य अमित शाह यांना कसं जाईल 2026? कुंडलीच सगळं सांगतेय

Amit Shah Kundali 2026 : भारतीय राजकारणाचे चाणक्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमित शहांबद्दल ज्योतिष वर्तुळात एक नवीन चर्चा सुरू झाली आहे. मागील काही वर्षात देशाच्या राजकीय पटलावर अमित शहा यांनी स्वतःचा असा ठसा उठवला आहे. निवडणूक कोणती असो अमित शहा यांची राजकीय रणनीती प्रत्येक वेळेस भाजपाला विजयापर्यंत घेऊन गेले. कोणत्या पक्षाचे आमदारांना आपल्या पक्षात प्रवेश द्यायचा ??कोणत्या वेळी कोणता डाव टाकायचा ??यामध्ये अमित शहा चांगलेच माहीर आहेत. आता ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार 2026 च्या वर्षात अमित शहा यांचा राजकीय धबधबा आणखी गडद होईल.

कुंडलीतील ग्रहांचा अद्भुत खेळ (Amit Shah Kundali 2026)

अमित शहांची कुंडली कन्या लग्नाची आहे आणि ज्योतिषांच्या मते, बुध आणि केतूची शक्तिशाली युती त्यांच्या यशाचे खरे गमक आहे. कन्या लग्नातील बुधाची शक्तीच त्यांना रणनीती आखण्याची शक्ती देते, अशी शक्ती जी सर्वात प्रमुख व्यक्तींनाही आश्चर्यचकित करते. Amit Shah Kundali 2026

इतिहासाची पुनरावृत्ती होईल का?

ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, २०२६ मध्ये सूर्य आणि बुध यांच्यातील घनिष्ठ मैत्री त्यांच्या कुंडलीला प्रचंड बळ देत आहे. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की ज्याप्रमाणे २०१९ मध्ये अमित शहा यांनी एका रात्रीत कलम ३७० रद्द करून संपूर्ण जगाला धक्का दिला, त्याचप्रमाणे २०२६ मध्येही असेच काहीतरी घडणार आहे. ग्रह सूचित करतात की अमित शहा असा ‘मास्टरस्ट्रोक’ खेळणार आहेत ज्याची विरोधी पक्षही कल्पना करू शकत नाहीत. हा निर्णय इतका महत्त्वाचा असू शकतो की तो भारतीय राजकारणाची समीकरणे पूर्णपणे बदलू शकतो.

विरोधकांसाठी धोक्याची घंटा?

२०२६ मध्ये अपेक्षित असलेले हे निर्णय विरोधी पक्षात खळबळ माजवू शकतात असा अंदाजही वर्तवला जात आहे. अमित शहा हे कधी काय करतील? कोणता डाव टाकतील याचा नेम नाही. त्यांच्या कुंडलीतील प्रभावशाली ग्रह हे दर्शवतात की ते त्यांच्या रणनीतींनी विरोधकांना पराभूत करण्यात पटाईत आहेत. भविष्यात त्यांचे नेतृत्व आणखी आक्रमक आणि प्रभावी होईल.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)