Shani Pradosh Vrat 2026 : ‘शनि प्रदोष व्रत’ शिव आणि शनिदेवाच्या कृपेसाठी करा ‘हे’ विशेष उपाय..

Published:
शनि प्रदोष व्रत (शनिवारी येणारी त्रयोदशी) शिव आणि शनिदेवाच्या कृपेसाठी अत्यंत फलदायी मानले जाते, ज्यामुळे साडेसाती, ढैय्या आणि कुंडलीतील दोष दूर होतात.
Shani Pradosh Vrat 2026 : ‘शनि प्रदोष व्रत’ शिव आणि शनिदेवाच्या कृपेसाठी करा ‘हे’ विशेष उपाय..

हिंदू धर्मात शनि प्रदोष व्रताचे विशेष महत्त्व आहे, विशेषतः शनि दोष दूर करून जीवनात स्थिरता मिळविण्यासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी. हे व्रत त्रयोदशी तिथीला असते आणि जेव्हा ते शनिवारी येते तेव्हा त्याला ‘शनि प्रदोष व्रत’ म्हणतात. जेव्हा हे प्रदोष व्रत कोणत्याही महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीच्या शनिवारी येते तेव्हा ते अधिक विशेष मानले जाते. शनि प्रदोष व्रताच्या दिवशी महादेव शिवासह शनिदेव आणि हनुमानाची पूजा केली जाते. या दिवशी काही विशेष उपाय केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात, चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात…

शिवपूजन

प्रदोष काळात (सूर्यास्ताच्या वेळी) भगवान शिवाला पंचामृत आणि गंगाजलाने अभिषेक करा. यामुळे शनिदोष कमी होतात. प्रदोष काळ हा सूर्यास्ताच्या आधी दीड तास आणि नंतरचा एक तास असा मानला जातो. या काळात केलेली पूजा सर्वाधिक फलदायी ठरते. भगवान शिवाला बिल्वपत्र अर्पण करावे. मान्यता आहे की या दिवशी शिवाला अर्पण केलेले बिल्वपत्र पूजेनंतर घरी आणून तिजोरीत ठेवल्याने धनवृद्धी होते.

या दिवशी उपवास केल्याने साडेसाती किंवा शनीच्या कुदृष्टीपासून मुक्ती मिळण्यास मदत होते. शनि प्रदोष व्रत हे शिव आणि शनिदेव या दोघांचा आशीर्वाद मिळवून देणारा अत्यंत शुभ दिवस आहे, जो सहसा त्रयोदशी तिथीला शनिवारी येतो. जर साडेसाती किंवा ढैय्या सुरू असेल, तर शनिप्रदोष व्रताच्या दिवशी शिवाची पूजा केल्यानंतर शनिदेवाचे विशेष पूजन करून शनि चालिसा वाचावी. या दिवशी कोणालाही अपशब्द बोलणे टाळावे.

कुत्र्याला भाकरी खायला द्या

शनि प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी मोहरीचे तेल लावलेली पोळी काळ्या कुत्र्याला खाऊ घालणे, हा शनिदेवाची कृपा मिळवण्याचा आणि न्यायालयीन प्रकरणे, शत्रू व नोकरीतील अडथळे दूर करण्याचा एक प्रभावी उपाय आहे.  संध्याकाळी घरातील पोळीवर (भाकरीवर) मोहरीचे तेल लावून काळ्या कुत्र्याला खाऊ घालणे अत्यंत शुभ मानले जाते, ज्यामुळे शनिचे अशुभ प्रभाव कमी होतात.

पिंपळाच्या झाडाखाली दिवा

प्रदोष काळात पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. त्यात थोडे काळे तीळ आणि एक लवंग टाकल्यास शनिदेव प्रसन्न होतात. पिंपळामध्ये शनिदेवाचा निवास मानला जातो. 

सात धान्यांचे दान

शनि प्रदोष व्रताच्या दिवशी शिव आणि शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी संध्याकाळी सात धान्यांचे (गहू, हरभरा, ज्वारी, उडीद, मसूर आणि तांदूळ) दान करणे अत्यंत प्रभावी मानले जाते. हे दान गरीब, वृद्ध व्यक्ती किंवा ब्राह्मणाला केल्यास आर्थिक समस्या सुटतात, कर्जमुक्ती होते आणि नोकरी-व्यवसायात स्थिरता येते.

वाहत्या पाण्यात काळे तीळ वाहणे

शनिदोष किंवा साडेसातीचा त्रास असल्यास, शनि प्रदोष व्रताच्या दिवशी काळे तीळ वाहत्या पाण्यात सोडावेत. यामुळे शनिदेवाची कृपा प्राप्त होते आणि संकटे दूर होतात.

मोहरीच्या तेलाचे छाया दान

एका वाटीत मोहरीचे तेल घेऊन त्यात स्वतःचा चेहरा पहा आणि हे तेल शनि मंदिरात किंवा गरजू व्यक्तीला दान करा. हा उपाय विशेषतः शनि साडेसती, धैया आणि कुंडलीत बसलेल्या शनि ग्रहाचे अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी प्रभावी आहे. यामुळे शनिदोषाची नकारात्मकता दूर होते.

काळे तीळ आणि कपडे दान

शनि प्रदोष व्रताच्या दिवशी गरजू व्यक्तीला काळे कपडे, काळे तीळ किंवा लोखंडाच्या वस्तू दान करा.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)
Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews