Shani Pradosh Vrat Katha : शनीची साडेसाती सतावतेय? शनि प्रदोष व्रताच्या दिवशी नक्की वाचा ‘ही’ पौराणिक कथा”

Published:
शनिवारच्या दिवशी येणाऱ्या त्रयोदशीला शनि प्रदोष व्रत म्हटले जाते. हे व्रत भगवान शिव आणि शनिदेवाला समर्पित आहे. या दिवशी उपवास करून प्रदोष काळात (संध्याकाळी) शिव-पार्वती आणि शनिदेवाची पूजा केल्याने साडेसाती, आर्थिक संकटे दूर होतात, उत्तम आरोग्य व सुख-समृद्धी प्राप्त होते.
Shani Pradosh Vrat Katha : शनीची साडेसाती सतावतेय? शनि प्रदोष व्रताच्या दिवशी नक्की वाचा ‘ही’ पौराणिक कथा”

शनि प्रदोष व्रत (शनिवारी येणारी त्रयोदशी) भगवान शिव आणि शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते. या दिवशी व्रत आणि कथा वाचल्याने शनिदोष (साडेसाती/ढैय्या) कमी होतो, संतती सुख मिळते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळात शिव-पार्वतीची पूजा करून कथा वाचन करणे आवश्यक मानले जाते.

व्रत आणि पूजेचे महत्त्व 

शनि प्रदोष व्रत संतान प्राप्तीसाठी सर्वात उत्तम मानले जाते. शनीची साडेसाती किंवा ढैय्या चालू असल्यास या दिवशी शिवपूजा केल्याने शनीचा प्रकोप शांत होतो.  हे व्रत केल्याने सर्व सांसारिक सुख आणि आर्थिक संकटातून मुक्ती मिळते.  हे व्रत श्रद्धेने केल्यास भगवान शिव प्रसन्न होतात आणि इच्छित फल देतात. आरोग्य, धन आणि सुख-शांती मिळवण्यासाठी हे उत्तम व्रत आहे. शनिदेवाला प्रसन्न केल्यामुळे अकाली मृत्यूचे भय राहत नाही.

शनि प्रदोष व्रत कथा

पौराणिक कथेनुसार, एकेकाळी एका गावात एक प्रसिद्ध व्यापारी राहत होता. तो खूप श्रीमंत होता आणि नेहमी इतरांना मदत करत असे. जो कोणी त्याच्या दारात मदत मागायला आला, तो कधीही रिकाम्या हाताने परत देत नाही. परोपकारी स्वभावामुळे त्यांना समाजात चांगली प्रतिष्ठा होती. मात्र, या व्यापाऱ्याला मुलं होत नव्हते. यामुळे तो आणि त्याची बायको कायम दुखी असायचे. एकदा व्यापारी आणि बायको तीर्थ यात्रेला जातात.

तीर्थयात्रेवर असताना त्यांना एका झाडाखाली एक साधू बसलेले दिसतात. हे साधू ध्यानस्थ अवस्थेत होते. दोघेही साधूकडे गेले आणि त्याच्यासमोर हात जोडून बसले. साधूचे ध्यान संपल्यावर त्यांनी त्या दोघांकडे पाहिले आणि त्यांना सांगितले की तुमचे दु:ख जे काही आहे ते मला अगोदरच माहीती आहे. साधू म्हणाले की, तुम्हाला एक मुलं पाहिजे आहे. यासाठी तुम्ही दोघांनी महादेवाची पूजा करा आणि विधिपूर्वक शनि प्रदोष व्रत करा. शिवच्या कृपेनेच तुम्हाला अपत्यप्राप्ती होईल. यानंतर साधूने त्याला शनि प्रदोष व्रताची पद्धतही सांगितली.

यानंतर व्यापारी आणि त्याची पत्नी साधूला नमन केले आणि तीर्थयात्रेला निघाले. तीर्थयात्रा करून परतल्यानंतर त्यांनी साधूने सांगितलेल्या पद्धतीनुसार शनि प्रदोष व्रत केले. काही काळ उपवास केल्यावर व्यापाऱ्याची पत्नी गरोदर राहिली आणि तिने मुलाला जन्म दिला. या व्रताच्या प्रभावाने, त्यांच्या आयुष्यातील दु:ख दूर झाले आणि त्यांना एका पुत्राची प्राप्ती झाली.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews