Tue, Dec 30, 2025

Air India PayDay Sale : 1950 रुपयांत विमानाने देशभर फिरा!! Air India चा खास सेल

Published:
मासिक पेडे सेल असं या सेलचं नाव असून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही उड्डाणांवर सवलतीच्या दरात तिकिटे उपलब्ध आहेत. या सेलच्या माध्यमातून देशांतर्गत प्रवास फक्त 1950 आणि आंतरराष्ट्रीय प्रवास 5590 रुपयांपासून तुम्ही करू शकता
Air India PayDay Sale : 1950 रुपयांत विमानाने देशभर फिरा!! Air India चा खास सेल

Air India PayDay Sale : विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. देशातील लोकप्रिय विमान वाहतूक कंपनी एअर इंडियाने नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर आपल्या प्रवाशांसाठी खास असा असेल आयोजित केलाय. मासिक पेडे सेल असं या सेलचं नाव असून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही उड्डाणांवर सवलतीच्या दरात तिकिटे उपलब्ध आहेत. या सेलच्या माध्यमातून देशांतर्गत प्रवास फक्त 1950 आणि आंतरराष्ट्रीय प्रवास 5590 रुपयांपासून तुम्ही करू शकता. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर यासाठी तुम्हाला बुकिंग करावे लागेल. या बुकिंगची अंतिम तारीख कधी आहे ??आणि तुम्ही कोणत्या काळात विमानाने प्रवास करू शकता याबद्दलची माहिती सविस्तर जाणून घेऊया.

प्रवास कधी करता येणार? Air India PayDay Sale

एअर इंडियाच्या मासिक पेडे सेलचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना एक जानेवारी 2026 पर्यंत बुकिंग करावे लागेल हे बुकिंग १२ जानेवारी ते १० ऑक्टोबर २०२६ पर्यंत देशांतर्गत प्रवासासाठी आणि १२ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी वैध असतील. म्हणजेच काय तर या काळात तुम्ही विमानाने प्रवास करू शकता.

सामान किती घेता येईल

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हलक्या सामानासह प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हलक्या भाड्याचा पर्याय सुरू करण्यात आला आहे, ज्यामध्ये चेक-इन केलेले सामान वगळता इतर काही पर्याय आहेत. देशांतर्गत उड्डाणांसाठी १५ किलो सामानासाठी ₹१,५०० आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी २० किलो सामानासाठी ₹२,५०० शुल्क आकारले जाते. Air India PayDay Sale

एअर इंडिया एक्सप्रेसने ग्राहकांना आणखी आकर्षित करण्यासाठी अनेक अतिरिक्त फायदे जोडले आहेत. एअर इंडिया एक्सप्रेस त्यांच्या मोबाइल अॅपद्वारे केलेल्या सर्व बुकिंगवर शून्य सुविधा शुल्क देत आहे. वेबसाइटवर नेट बँकिंगद्वारे केलेल्या पेमेंटसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.