Tue, Dec 30, 2025

Kalyan Latur Highway : कल्याण – लातूर महामार्ग या 6 जिल्ह्यातून जाणार

Published:
सध्या जी माहिती समोर येत आहे त्यानुसार कल्याण ते लातूर महामार्ग ठाणे, पुणे, अहिल्यानगर, बीड, धाराशीव आणि लातूर या सहा जिल्ह्यांतून जाणार आहे.
Kalyan Latur Highway : कल्याण – लातूर महामार्ग या  6 जिल्ह्यातून जाणार

Kalyan Latur Highway : मुंबई आणि मराठवाड्यासाठी गेम चेंजर ठरणाऱ्या लातूर कल्याण महामार्गाला राज्य मंत्रिमंडळाने काही दिवसांपूर्वीच मंजुरी दिली आहे. सध्या लातूर वरून कल्याणला जायचं म्हंटल तर १०-१२ तास लागतात, मात्र एकदा हा महामार्ग तयार झाला तर हेच अंतर ५ तासांत गाठणं शक्य होणार आहे. मराठवाड्यातून मुंबईला शिक्षण आणि कामानिमित्त स्थायिक झालेल्या प्रवाशांसाठी हा नवा महामार्ग वरदान ठरणार आहे. आता या प्रकल्पाबाबत नवीन अपडेट समोर येत आहे.

एमएसआरडीसीने सल्लागारामार्फत संरेखनाचे काम सुरू

हा प्रकल्प नेमका कोणत्या जिल्ह्यांमधून जाणार आणि याचा रूट कसा असेल या संदर्भात नवीन माहिती समोर आली आहे.  नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाचे सादरीकरण पाहिले अन सदर प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिलेत. आता राज्य सरकारच्या मान्यतेनंतर एमएसआरडीसीने सल्लागारामार्फत संरेखनाचे काम सुरू केले आहे. या महामार्गाचे अलाइनमेंट पूर्ण झाल्यानंतर हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यांमधून जाणार आणि याचा रूट कसा राहणार याबाबत योग्य ती माहिती समोर येणार आहे. Kalyan Latur Highway

कोणकोणत्या जिल्ह्यातून जाणार महामार्ग (Kalyan Latur Highway)

सध्या जी माहिती समोर येत आहे त्यानुसार कल्याण ते लातूर महामार्ग ठाणे, पुणे, अहिल्यानगर, बीड, धाराशीव आणि लातूर या सहा जिल्ह्यांतून जाणार आहे. याचा रूट उल्हासनगर, मुरबाड, जुन्नर, अहिल्यानगर, आष्टी, पाटोदा, बीड, केज, कळंब, लातूर, औसा आणि निलंगा असा राहील अशी माहिती देण्यात आली आहे. एमएसआरडीसीने स्पष्ट केले आहे की, तांत्रिक आणि आर्थिकदृष्ट्या योग्य ठरणारे संरेखनच अंतिम केले जाईल.