Marathi News

Konkan Railway : आंगणेवाडी जत्रेसाठी ‘स्पेशल ट्रेन’ची घोषणा; मुंबई–कोकण प्रवाशांचा प्रवास होणार सोप्पा

Published:
आंगणेवाडीतील श्री भराडी देवीची प्रतिक्षित जत्रा जवळ येत असताना भाविकांची मोठी हालचाल सुरू झाली आहे. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या या जत्रेला यंदा साधारण दहा लाखांहून अधिक भाविक उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Konkan Railway : आंगणेवाडी जत्रेसाठी ‘स्पेशल ट्रेन’ची घोषणा; मुंबई–कोकण प्रवाशांचा प्रवास होणार सोप्पा

Konkan Railway : आंगणेवाडीतील श्री भराडी देवीची प्रतिक्षित जत्रा जवळ येत असताना भाविकांची मोठी हालचाल सुरू झाली आहे. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या या जत्रेला यंदा साधारण दहा लाखांहून अधिक भाविक उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दक्षिण कोकणची काशी म्हणून परिचित असलेल्या या जत्रेला मुंबई आणि महाराष्ट्रातील विविध भागांतून भक्त मोठ्या संख्येने येतात. वाढत्या गर्दीचा आणि प्रवासातील अडचणींचा विचार करून कोकण रेल्वेने यंदा विशेष ट्रेनची घोषणा करून मोठा दिलासा दिला आहे.

आंगणेवाडीची जत्रा वर्षातून एकदाच भरत असली तरी तिची तयारी अनेक दिवस आधीपासून सुरू होते. देवीची चैत्र-भव्य सजावट आणि आंगणे परंपरेचा आनंद घेण्यासाठी भाविक आतुरतेने वाट पाहत असतात. या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. नेहमीच्या गाड्यांमध्ये जागा मिळणे कठीण होत असल्याने रेल्वेने विशेष साप्ताहिक गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

कसे असेल वेळापत्रक

रेल्वेच्या वेळापत्रकानुसार, लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव जंक्शन मार्गावर ट्रेन क्रमांक 01003 ही 8 आणि 10 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7 वाजून 55 मिनिटांनी सुटेल. ही गाडी त्याच दिवशी रात्री 10 वाजता मडगाव येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी ट्रेन क्रमांक 01004 मडगावहून 7 आणि 9 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी 4 वाजून 30 मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजून 50 मिनिटांनी मुंबईला पोहोचेल. Konkan Railway

कोणकोणत्या स्थानकावर थांबा Konkan Railway

या गाड्यांना वाटेत महत्त्वाच्या करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे या स्थानकांवर थांबे असतील. या दोन्ही विशेष ट्रेनमध्ये एकूण 22 कोच उपलब्ध असतील, ज्यामध्ये 20 स्लीपर कोच आणि 2 एसएलआर कोचचा समावेश आहे.

जत्रेसाठी प्रवासाची अचूक माहिती जाणून घेण्यासाठी आणि सर्व अद्ययावत तपशील पाहण्यासाठी [www.enquiry.indianrail.gov.in](http://www.enquiry.indianrail.gov.in) या संकेतस्थळाचा वापर करता येईल. विशेष म्हणजे, ट्रेन क्रमांक 01004 साठी तिकीट बुकिंगची प्रक्रिया 4 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झाली आहे. जत्रेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी तिकीटांचा तुटवडा टाळण्यासाठी लवकरात लवकर आरक्षण करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews