Marathi News

फेब्रुवारीत 5 दिवस दारू मिळणार नाही; ड्राय डे मुळे तळीरामांची पंचाईत

Published:
महाराष्ट्रात 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून ड्राय डे (दारूबंदी) जाहीर करण्यात आला आहे.
फेब्रुवारीत 5 दिवस दारू मिळणार नाही; ड्राय डे मुळे तळीरामांची पंचाईत

महाराष्ट्रात 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून ड्राय डे (दारूबंदी) जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीत दारूची दुकाने बंद राहणार असून, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यास पूर्णतः बंदी असणार आहे. ज्या भागात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका होत आहेत, त्या सर्व ठिकाणी हा ड्राय डे लागू राहणार आहे.

निवडणूक पुढे ढकलण्यामागील कारण

राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.  आधी 5 फेब्रुवारी रोजी होणारे मतदान आता 7 फेब्रुवारी रोजी होणार आहे.  तर मतमोजणी 9 फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे.

खालील 12 जिल्ह्यांमध्ये 7 आणि 9 फेब्रुवारीला दारू विक्री पूर्णतः बंद राहणार

रायगड
रत्नागिरी
सिंधुदुर्ग
पुणे
सातारा
सांगली
सोलापूर
कोल्हापूर
छत्रपती संभाजीनगर
परभणी
धाराशीव
लातूर

फेब्रुवारी महिन्यात एकूण 5 दिवस ड्राय डे

निवडणुकांसह फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रात एकूण 5 दिवस ड्राय डे असणार आहे.

7 फेब्रुवारी – जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदान
9 फेब्रुवारी – मतमोजणी
15 फेब्रुवारी (रविवार) – महाशिवरात्री
19 फेब्रुवारी (गुरुवार) – छत्रपती शिवाजी महाराज जयंती (राज्य सुट्टी)
23 फेब्रुवारी (सोमवार) – स्वामी दयानंद सरस्वती जयंती

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews