हिंदू धर्मात शिंका येण्याबाबत अनेक दंतकथा आहेत, ज्यात कधी ते शुभ मानले जाते तर कधी अशुभ लक्षण मानले जाते. शिंका येणे हे शरीराचे नैसर्गिक कार्य आहे. याबद्दल जाणून घेऊयात…
शिंकणे कधी अशुभ मानले जाते?
प्रवासाच्या सुरुवातीला
घराबाहेर पडताना किंवा प्रवासाला निघताना लगेच शिंक येणे अशुभ मानले जाते, यामुळे प्रवासात अडथळे येऊ शकतात.
कपडे घालताना
कपडे परिधान करताना शिंकणे हे त्या दिवशी काहीतरी वाईट घडणार असल्याचे लक्षण मानले जाते.
नवीन काम सुरू करताना
एखादे महत्त्वाचे काम सुरू करण्यापूर्वी शिंक आल्यास ते काम पूर्ण होण्यास अडथळे येऊ शकतात.
शिंकणे कधी शुभ मानले जाते?
दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी येणाऱ्या शिंकांचे वेगवेगळे अर्थ असतात, ज्यात काहीवेळा ती चांगली लक्षणे असू शकतात. शिंक येण्याचे शुभ-अशुभ फल हे व्यक्तीच्या मानसिक स्थितीवर आणि धार्मिक श्रद्धेवर अवलंबून असते. आंघोळ करताना शिंकणे शुभ मानले जाते, यातून चांगली बातमी किंवा धनलाभ होऊ शकतो. जेवताना किंवा जेवणानंतर लगेच शिंकणे हे सुद्धा शुभ मानले जाते. दुपार ते मध्यरात्रीच्या दरम्यान येणारी शिंक काही संस्कृतींमध्ये नशिबाचे लक्षण मानली जाते.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)





