Mon, Dec 29, 2025

Money Tips : पाकिटातील या गोष्टी तुम्हाला गरीब बनवतात; आजच काढून ठेवा

Published:
आजच्या धावपळीच्या जीवनात खिशातील पाकीट ही अतिशय महत्त्वाची वस्तू बनली आहे. पाकिटात आपण रोख रक्कम, क्रेडिट आणि डेबिट कार्ड, ओळखपत्र आणि इतर आवश्यक वस्तू ठेवतो
Money Tips : पाकिटातील या गोष्टी तुम्हाला गरीब बनवतात; आजच काढून ठेवा

Money Tips : मित्रांनो तुमच्याकडे नक्कीच पाकीट खिशात असणार… आजच्या धावपळीच्या जीवनात खिशातील पाकीट ही अतिशय महत्त्वाची वस्तू बनली आहे. पाकिटात आपण रोख रक्कम, क्रेडिट आणि डेबिट कार्ड, ओळखपत्र आणि इतर आवश्यक वस्तू ठेवतो. परंतु, वास्तुशास्त्रानुसार, तुमच्या पर्समध्ये काही वस्तू ठेवल्याने लक्ष्मी माता रागावू शकते. यामुळे आर्थिक अडचणी, अनावश्यक खर्च आणि पैशांची कमतरता निर्माण होते. अशावेळी आज आपण जाणून घेऊया कोणत्या वस्तू तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू नयेत.

चुरगळलेल्या नोटा

तुमच्या पर्समध्ये फाटलेल्या किंवा चुरगळलेल्या नोटा ठेवल्याने तुमची संपत्ती नष्ट होऊ शकते. वास्तुनुसार, हे अत्यंत अशुभ मानले जाते कारण ते नकारात्मक उर्जेला आमंत्रित करते आणि घरात पैसे राहण्यापासून रोखते. नेहमी स्वच्छ आणि नवीन नोटा ठेवा.

जुनी बिले (Money Tips)

बरेच लोक त्यांच्या पर्समध्ये खरेदीची बिले, जुन्या पावत्या किंवा इतर कागदपत्रे ठेवतात . या वस्तू पर्समध्ये नकारात्मक ऊर्जा वाढवतात, ज्यामुळे पाकीटची जागा तर व्यातेच याशिवाय अशा जुन्या कागदपत्रांमुळे तुमचं पाकीट मोकळं होण्याची शक्यता जास्त असते. Money Tips

ऑफिसची चावी पाकीटात ठेऊ नका

घर, गाडी किंवा ऑफिसच्या चाव्या तुमच्या पाकिटात ठेवल्याने आर्थिक नुकसान होऊ शकते आणि व्यवसायात अडथळे येऊ शकतात. त्याचप्रमाणे, चाकू, कात्री, ब्लेड किंवा कोणतीही तीक्ष्ण वस्तू ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होतात, ज्यामुळे आर्थिक स्थिरतेवर परिणाम होतो.

तुमच्या पाकिटात औषधे देखील ठेऊ नये. यामुळे आजारपण येऊ शकते. शिवाय, फाटलेले किंवा खूप जुने पाकीट वापरल्याने आर्थिक समस्या देखील वाढतात. तुमचे पाकीट कधीही पूर्णपणे रिकामे ठेवू नका, कारण रिकामे पाकीट पैशांच्या कमतरतेचे प्रतीक आहे.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)