BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने एक मोठा निर्णय घेतलाय. मुंबईत पवार ठाकरे बंधूंना साथ देताना दिसतील. विशेष म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत नुसती युती झाली नाही आहे,तर जागावाटप देखील ठरलं आहे. शरद पवारांनी ठाकरे बंधूंना साथ दिल्याने मुंबईत मराठी अस्मितेच्या मुद्द्याला आणखी बळकटी मिळणार आहे.
शरद पवारांना किती जागा मिळाल्या? BMC Election 2026
दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीत युती आणि जागा वाटपावर चर्चा झाल्याचं बोललं जात होतं. अखेर शरद पवारांचा पक्ष ठाकरे बंधूंना साथ देणार आहे. ठाकरे बंधूं कडून शरद पवारांच्या पक्षाला मुंबईत दहा जागा देण्यात आल्याचे बोलले जाते. खरंतर पवारांनी मुंबईत 52 जागांचा प्रस्ताव सुरुवातीला टाकला होता मात्र जागा वाटपाच्या चर्चात हा आकडा दहा जागांवर येऊन ठेपला. तडजोड करत ठाकरे बंधु 10 जागा देण्यावर राजी झाले आहेत. त्यामुळे आता मुंबई महापालिका निवडणूकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाची ठाकरे बंधू सोबत निवडणूक लढवताणा दिसतील. BMC Election 2026
पवारांना कोणकोणत्या जागा?
शरद पवारांना मुंबईतील नेमक्या कोणत्या दहा जागा देण्यात आल्या याबाबत माहिती अजून समोर आलेली नाही. विशेष म्हणजे निवडणुकीचा अर्ज भरण्यास आता फक्त दोन दिवस उरले आहेत, मंगळवारपर्यंत अर्ज भरण्याची मुभा सर्व पक्षांना आहे. त्यामुळे हा अवधी पाहता आज रात्री उशिरा पर्यंत सर्वच पक्ष आपली उमेदवारी जाहीर करतील अशी शक्यता आहे. शरद पवारांच्या पाठिंबामुळे ठाकरे बंधूंना मुंबईत दहा हत्तीचे बळ मिळाल आहे.





