घरातील स्वयंपाकघर हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही वास्तु टिप्स सांगणार आहोत, ज्या स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्यापूर्वी लक्षात ठेवल्या पाहिजेत. चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात …
आंघोळ
वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरात आरोग्य आणि समृद्धीसाठी आंघोळ करूनच जेवण बनवावे, शांत मनाने स्वयंपाक करावा, रागाच्या भरात स्वयंपाक टाळावा. मन शांत ठेवल्यास अन्नपूर्णा देवी प्रसन्न होते.
स्वच्छता
किचन नेहमी स्वच्छ ठेवावे, कारण अस्वच्छता नकारात्मक ऊर्जा आणते आणि आरोग्य बिघडवते. स्वयंपाकघरात स्वच्छता ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आरोग्य चांगले राहते.
पाण्याची जागा
सिंक किंवा पाण्याची जागा आग्नेय दिशेपासून दूरअसावी. स्टोव्ह आणि सिंक एकमेकांच्या खूप जवळ किंवा विरुद्ध दिशेला नसावेत. गॅस स्टोव्ह खिडकीच्या खाली नसावा, कारण यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतो.
अन्न शिजवताना
अन्न शिजवताना मनात सकारात्मक विचार असावेत, कारण अन्नातूनच घरात ऊर्जा जाते, असे मानले जाते. जेवण बनवताना मन शुद्ध ठेवावे. नकारात्मकता आणि घाणेरडेपणाने बनवलेले अन्न कधीच चवदार नसते. असे अन्न सेवन केल्याने व्यक्ती आजारांना बळी पडते. त्याच्या मनावर आणि विचारावर विपरीत परिणाम होतो.
ताट दोन्ही हातांनी द्या
जेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला जेवणाचे ताट द्याल, तेव्हा ते नेहमी दोन्ही हातांनी द्यावे. एका हाताने ताट दिल्यास त्यात भूत-आत्मा वास करतात, अशी मान्यता आहे. जेवतानाची थाळी (ताट) चुकीच्या पद्धतीने ठेवल्यास वास्तुदोष निर्माण होऊ शकतो, त्यामुळे जेवतानाही वास्तु नियमांचे पालन करावे.
तुटलेली भांडी
तुटलेल्या किंवा भेगा पडलेल्या भांड्यांमध्ये अन्न बनवणे किंवा खाणे टाळावे, यामुळे गरिबी येते.
शिळे अन्न
शिळे अन्न आणि जास्त काळ ठेवलेले मळलेले पीठ स्वयंपाकघरात ठेवू नका, यामुळे शनि आणि राहूचे वाईट परिणाम भोगावे लागतात.
आरसा टाळा
स्वयंपाकघरात आरसा ठेवू नका, यामुळे नकारात्मक ऊर्जा आणि आर्थिक नुकसान होते.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)





