Tue, Dec 30, 2025

Khushi Mukherjee On Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादव मला खूप मेसेज करायचा; अभिनेत्रीच्या दाव्याने खळबळ

Published:
अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत खुशीने दावा केला की अनेक प्रसिद्ध क्रिकेटपटू तिच्या मागे होते. तिने सांगितले की सूर्यकुमार यादव तिला वारंवार मेसेज करत असत. मात्र, आता त्यांच्यात फारसे बोलणे होत नाही
Khushi Mukherjee On Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादव मला खूप मेसेज करायचा; अभिनेत्रीच्या दाव्याने खळबळ

Khushi Mukherjee On Suryakumar Yadav : दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टी, रिअॅलिटी शो आणि बोल्ड वेब सीरिजमधून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री आणि मॉडेल खुशी मुखर्जी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आपल्या ग्लॅमरस लूक, बिनधास्त स्टाईल आणि वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणारी खुशी सोशल मीडियावर कायमच चर्चेचा विषय असते. यावेळी तिने भारतीय टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्याबद्दल केलेले वक्तव्य विशेषत्वाने चर्चेत आहे.

अनेक क्रिकेटपटू मागे लागले होते ( Khushi Mukherjee On Suryakumar Yadav)

अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत खुशीने दावा केला की अनेक प्रसिद्ध क्रिकेटपटू तिच्या मागे होते. तिने सांगितले की सूर्यकुमार यादव तिला वारंवार मेसेज करत असत. मात्र, आता त्यांच्यात फारसे बोलणे होत नाही. खुशी म्हणाली की तिला कोणत्याही प्रकारचा लिंक-अप नको आहे आणि या सगळ्यापासून दूर राहणे तिला जास्त पसंत आहे. त्यामुळे वास्तविक कोणत्याही नात्याचा प्रश्नच येत नाही, असे स्पष्टीकरणही तिने दिले. या वक्तव्यामुळे क्रिकेटविश्व आणि मनोरंजन क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावरही या खुलाशावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. Khushi Mukherjee On Suryakumar Yadav

खुशी मुखर्जी कोण आहे?

24 नोव्हेंबर 1996 रोजी कोलकाता येथे जन्मलेल्या खुशी मुखर्जीनं 2013 मध्ये तमिळ चित्रपट ‘अंजल थुराई’ द्वारे अभिनयात पदार्पण केले. त्यानंतर तिने तेलुगू चित्रपट ‘डोंगा प्रेमा’ आणि ‘हार्ट अटॅक’मध्ये भूमिका साकारल्या. हिंदीमध्ये ती ‘श्रृंगार’ या चित्रपटात दिसली. तथापि, तिला खरी लोकप्रियता मिळाली ती भारतीय रिअॅलिटी शोमुळे.

एमटीव्हीच्या स्प्लिट्सविला 10 आणि लव्ह स्कूल 3 या दोन लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होऊन खुशीनं प्रेक्षकांमध्ये आपली विशेष ओळख निर्माण केली. त्यानंतर ती ‘बालवीर रिटर्न्स’मध्ये ज्वाला परी या भूमिकेत झळकली. तसेच ‘कहत हनुमान जय श्रीराम’ या पौराणिक मालिकेतही तिने महत्वपूर्ण भूमिका निभावली.

याशिवाय, प्रौढ-थीम असलेल्या भारतीय वेब सिरीजमध्येही तिची ओळख मजबूत झाली असून, या प्रोजेक्ट्समुळे ती चर्चेत राहिली आहे. तिच्या कारकिर्दीत जितका ग्लॅमर आहे, तितकेच वाद देखील तिच्या सोबत जोडले गेले आहेत. खुशीचे सूर्यकुमार यादव यांच्याबद्दलचे विधान सध्या सोशल मीडियावर तापलेले असून, येत्या काही दिवसांत यावर आणखी प्रतिक्रिया येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.